शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ओझर्डेत हेलिपॅडचे काम पूर्ण : एकनाथ शिंदे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 13:20 IST

मागील पाच वर्षात एप्रिल २०१९ पर्यंत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर एकूण १ हजार ४३६ अपघात झाले आहे

ठळक मुद्देजखमींना मिळणार वेळेत उपचारजखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी ट्रामा केअर सेंटर व हेलिपॅड उभारण्याचे २०१६ पासून प्रस्तावित

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वारंवार अपघात होत आहे. तसेच या मार्गावर अनेकांना वेळवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. राज्य सरकारने यावर उपाययोजना करण्यासाठी आणि अपघातग्रस्त नागरिकांना तातडीने उपचार मिळावे यासाठी द्रूतगती महामार्गावर ओझर्डे (ता. मावळ) येथे ट्रामा केअर सेंटर आणि जखमींना वेळेवर रुग्णालयात नेण्यासाठी हेलिपॅड तयार करण्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिली. मागील पाच वर्षात एप्रिल २०१९ पर्यंत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर एकूण १ हजार ४३६ अपघात झाले आहे. त्यामध्ये ५१८ जणांचा बळी गेला आहे. तसेच ५९३ जण गंभीररित्या जखमी झाले आहे. तर १२८ जण किरकोळ जखमी झाले आहेत, अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली. सातत्याने घडणाऱ्या अपघाताबाबत विधान परिषदेमध्ये तारांकित  प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. द्रूतगती महामार्गावरील अपघातांमधील जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी ट्रामा केअर सेंटर व हेलिपॅड उभारण्याचे २०१६ पासून प्रस्तावित केले आहे. याकामासाठी अडीच वर्षांपासून विलंब होत असल्याबाबतचा प्रश्न आमदारांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ओझर्डे येथे ट्रामा केअर सेंटर व हेलिपॅड बांधण्यासाठी निविदा प्रसिध्द केली होती. याठिकाणी ट्रामा केअर सेंटरसाठी ३ हजार ४०० चौरस फूट इमारत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरीत केली आहे. तसेच हेलिपॅड बांधण्याचे कामही पूर्ण झाले आहे. ट्रामा केअर सेंटरसाठी महामंडळाने आॅपरेटिंग एजन्सीची नियुक्ती केली आहे. सध्यस्थितीत या इमारतीची डागडुजी करून ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच हेलिपॅड उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गEknath Shindeएकनाथ शिंदेAccidentअपघातhospitalहॉस्पिटल