शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

गजबजलेल्या भागांत महिलांची कुचंबणा

By admin | Updated: June 13, 2015 04:48 IST

स्वच्छतागृहच नसणे, असली तरीपण ती बंद अवस्थेत किंवा त्यांना टाळे ठोकलेले. काहींची दुरवस्था झालेली तर दिशादर्शकच नसल्यामुळे या

पुणे : स्वच्छतागृहच नसणे, असली तरीपण ती बंद अवस्थेत किंवा त्यांना टाळे ठोकलेले. काहींची दुरवस्था झालेली तर दिशादर्शकच नसल्यामुळे या भागात स्वच्छतागृह आहेत याची अनेकांना माहितीच नाही, हे चित्र आहे मध्यवस्तीतील अत्यंत वर्दळीच्या भागातील शहरांमधल्या महिला स्वच्छतागृहांचे! तुळशीबाग, रविवार पेठ, मंडई, फर्ग्युसन रस्ता या भागातील स्वच्छतागृहांच्या या अवस्थेमुळे महिलांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत, मात्र याची ना महापालिका प्रशासनाला जाण आहे ना लोकप्रतिनिधींना! महिलांच्या स्वच्छतागृहांबाबतच्या या गंभीर प्रश्नाकडे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षच केले जात आहे, नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत केसस्टडी म्हणून शहरात उभ्या करण्यात आलेल्या स्वच्छतागृह प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे, या स्वच्छतागृहांची स्थिती प्रत्यक्षात कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’च्या महिला प्रतिनिधींनी शहरातील गजबजलेल्या ठिकाणांची पाहणी केली असता हे धक्कादायक चित्र समोर आले. साधारणपणे लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग किंवा फर्ग्युसन रस्ता हा परिसर खरेदीसाठी प्रसिद्ध असल्याने महिलांचा येथे मोठ्या प्रमाणावर वावर पाहायला मिळतो. हे प्रमाण पाहता या भागांमध्ये एक किमीच्या अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह किंवा सुलभ शौचालय असणे आवश्यक आहे, काही भागात ती आढळलीदेखील! मात्र दिशादर्शक नसल्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या महिलांनाच काय बहुतांश पुरुषवर्गालासुद्धा याची माहिती नसल्याचे दिसून आले. त्यामुळेच ‘काही कल्पना नाही’ अशीच उत्तरे पुरुषांकडून ऐकायला मिळाली. त्यामुळे ती शोधण्यासाठी काहीसे फिरण्याची वेळ आली. महिला विक्रेत्यांचीही स्वच्छतागृहांअभावी गैरसोय होत आहे काही स्वच्छतागृहे आतून चांगली आहेत, बाहेरून मात्र तिथे पोचता येत नाही.