शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घरकाम करणार्‍या महिलेने पळविली चक्क तिजोरी; दागिन्यांसह २५ लाखांचा ऐवज लंपास; पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 16:52 IST

घरकाम करणार्‍या महिलेने काम करत असलेल्या घरातील चक्क इलेक्ट्रॉनिक तिजोरीच चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे : रात्री अपरात्री येऊन चोरटे एटीएमचे मशीन, बँकांमधील तिजोरी चोरुन नेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या होत्या. मात्र, घरकाम करणार्‍या महिलेने काम करत असलेल्या घरातील चक्क इलेक्ट्रॉनिक तिजोरीच चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी जयश्री (रा. वानवडी) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ७६ वर्षाच्या वृद्धाने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी व त्यांच्या पत्नी कोंढवा भागातील कमेला परिसरातील गुलमोहर सोसायटीत राहतात. फिर्यादी हे परदेशात नोकरीला होते. सेवानिवृत्तीनंतर ते पुण्यात रहायला आले आहेत़. घरात दोघेच जण असतात. २७ जुलै रोजी एक महिला त्यांच्याकडे काम मागण्यासाठी आली होती. त्यांनाही घरकामासाठी महिलेची आवश्यकता असल्याने तिला कामाला ठेवून घेतले. मात्र, तिला कामाला ठेवून घेताना त्यांनी तिची काहीही माहिती घेतली नव्हती. शिवाय मोबाईल नंबरही घेतला नाही. दोन दिवस काम पाहिल्यानंतर त्यांना तिचे काम चांगले वाटले. ३० जुलैला दुपारी चार वाजता ती काम करुन निघून गेली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी ३१ जुलै रोजी परत कामाला आलीच नाही. त्यांनी वाट पाहिली पण, तिच्याशी संपर्क साधण्यासाठी तिच्याविषयी काहीही माहिती त्यांच्याकडे नव्हती. 

फिर्यादी यांच्या पत्नी शुक्रवारी तिजोरीत दागिने ठेवण्यासाठी गेल्या. तेव्हा त्यांना तिजोरी जागेवर आढळून आली नाही. त्यांच्या या तिजोरीला बायोमेट्रिक कुलूप आहे. तिजोरीत ५३२ ग्रॅम वजनाचे २४ लाख २३ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने, ५५ हजार रुपये रोख, ५०० अमेरिकन डॉलर, ४ हजार दुबई दिनार असे परदेशी चलन व १० हजार रुपयांची तिजोरी असा २४ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. घरात काम करताना तिने संपूर्ण वेळ मास्क वापरला असल्याने फिर्यादी यांनी तिचा चेहरा पाहिला नव्हता. तीन दिवस काम करुन तिने एका वयोवृद्ध कुटुंबाला आपला हिसका दाखविला. तिजोरी उघडता न आल्याने तिने अख्खी तिजोरीच चोरुन नेली असल्याचा पोलिसांचया प्राथमिक अंदाज आहे.मात्र, आता ही तिजोरी तिला उघडता  आली का हा प्रश्न निर्माण झाला आहे़. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी