शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

असंघटित क्षेत्रातील महिलांचेही होते लैंगिक शोषण; गप्प राहून मोजावी लागते आर्थिक सुरक्षेची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 17:09 IST

अहमदाबादच्या प्रा. अक्षया विजयालक्ष्मी यांच्या सर्वेक्षणातून समोर आले निष्कर्ष

पुणे : असंघटित क्षेत्रातील महिलांनाही कामाच्या ठिकाणी होणा-या लैगिंक अत्याचारांचा सामना करावा लागतो. मात्र बहुतांश महिला लैंगिक अत्याचारांबाबत तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. तसेच त्यांच्या कुटुंबाकडे तक्रार करण्यापेक्षा नोकरी बदलण्यास त्या प्राधान्य देतात. महिलांना आपल्या आर्थिक सुरक्षेची किंमत त्यांच्याशी होणा-या छेडछाडीबददल गप्प राहूनच मोजावी लागते, असे निष्कर्ष एका संशोधनात्मक पाहाणीमधून समोर आले आहेत.

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मँनेजमेंट अहमदाबादच्या (आयआयएमए) मार्केटिंग विभागातील सहायक प्राध्यापक प्रा.अक्षया विजयालक्ष्मी यांनी  असंघटित क्षेत्रातील महिला कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराचा सामना कसा करतात याबददलच्या संशोधनात्मक अभ्यासाकरिता पुणे आणि अहमदाबादमधील 300 हून अधिक स्थानिक कर्मचा-यांचे सवर््हेक्षण आणि चर्चेतून हे निष्कर्ष समोर आणले आहेत. त्यामध्ये असंघटित क्षेत्रातील महिला अशा प्रकारे होणा-या अत्याचाराची तक्रार करण्यास धजावत नाहीत. जोवर महिलांना आपल्यावर होणा-या अत्याचारांचे ठोस पुरावे, जसेकी फोनवरील रेकॉर्डस संभाषणे किंवा मेसेजेस सापडत नाहीत तोवर त्या तक्रार करायला पुढे येत नाहीत. मात्र, मोठ्या निवासी संकुलातील किंवा उच्चभ्रू सोसायटयांमधील घरेलू कामगार महिला अशा प्रकारच्या तक्रारी करण्यास सहजतेने पुढे येत असल्याचे आढळले आहे. यात तक्रार करणा-या पीडित महिलांना नोकरी सोडून द्यावी लागणे अथवा त्रास देणारे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे होणे अशा दडपणाखाली जगावे लागत असल्याचे सांगण्यात आले आहे.

तक्रार नोंदवण्यास महिलाच अनाभिज्ञ 

भारतातील अधिकतर महिला कामगार या असंघटित क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक महिला घरांमध्ये अगदी जेवण बनविण्यापासून धुणी-भांडी किंवा अगदी शेतातही कामे करताना दिसतात. अशा ठिकाणी कधी कधी अगदी कमी महिला कामगार किंवा एकच व्यक्ती काम करत असते. त्यामुळे अंतर्गत तक्रार समिती वगैरेचा प्रश्नच उदभवत नाही. यातच बहुतांश महिलांना जिल्हा स्थानिक तक्रार कमिटी (एलसीसी) कडे जाऊन आपली तक्रार नोंदवून आपली बाजू मांडता येऊ शकते. मात्र याविषयी महिलाच अनाभिज्ञ आहेत. त्यातून अशा महिलांचे उत्पन्न थोडकेच असल्याने रजा काढून जाणे त्यांना परवडत नाही असे प्रा. अक्षया विजयालक्ष्मी (सहायक प्राध्यापक , इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मँनेजमेंट अहमदाबाद) यांनी सांगितले. 

 

टॅग्स :PuneपुणेSexual abuseलैंगिक शोषणWomenमहिलाPoliceपोलिस