women dead due to tree branch fall on her head | झाडाची फांदी पडून दिव्यांग महिलेचा मृत्यू ; पुण्यातील आपटे राेडवरची घटना
झाडाची फांदी पडून दिव्यांग महिलेचा मृत्यू ; पुण्यातील आपटे राेडवरची घटना

पुणे : झाडाची फांदी डाेक्यात पडून एका 48 वर्षीय दिव्यांग महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील आपटे रस्त्यावर ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली. 

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे महापालिकेकडून नेहरु सांस्कृतिक केंद्रामध्ये दिव्यांगांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक बाेलावली हाेती. या बैठकीला विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते. त्यावेळी प्रहार क्रांती अपंग संघटनेच्या पदाधिकारी असलेल्या जयश्री जगताप या इतर सहकाऱ्यांसाेबत चहा पिण्यासाठी संताेष बेकरी जवळील एका चहाच्या दुकानावर आल्या हाेत्या. त्यावेळी त्या ठिकाणच्या एका झाडाची कुजलेली फांदी त्यांच्या डाेक्यात काेसळली. इतर सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले. जगताप या दिव्यांग हाेत्या. ज्या ठिकाणची फांदी पडली ती फांदी सुरक्षेच्या दृष्टिकाेनातून अर्धी कापण्यात आली हाेती, उरलेली फांदी कुजून पावसाच्या पाण्याच्या ओझ्यामुळे काेसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  

याप्रकरणी डेक्कन पाेलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. 


Web Title: women dead due to tree branch fall on her head
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.