हडपसर-सासवड रोडवर कारच्या धडकेत स्वच्छता कर्मचारी महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 10:00 IST2023-06-05T09:59:58+5:302023-06-05T10:00:59+5:30
ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली...

हडपसर-सासवड रोडवर कारच्या धडकेत स्वच्छता कर्मचारी महिलेचा मृत्यू
हडपसर (पुणे) :हडपसरहून सासवडच्या दिशेने जाणाऱ्या कारने सातववाडी येथे आज सकाळी स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिलेला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. छाया भजनराव शिंदे (वय 42) मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
आज सकाळी सातच्या सुमारास सातववाडी येथील रस्त्याच्या कडेला झाडू मारून रस्ता साफ करताना पुणेहून सासवडच्या दिशेने जाणाऱ्या कारने महिलेला धडक दिली, त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. या रस्त्यावर आतापर्यंत चार जणांचा असाच अपघात झालेला आहे. गोंधळेनगरच्या कमानीसमोरही कचरा गोळा करणाऱ्या महिलेला धडक दिल्यानंतर तिचा पाय त्यामध्ये गेला. अपघातानंतर पंधरा दिवसानंतर तिचा मृत्यू झाला होता.
शाळेत जाणाऱ्या बाप लेकीचा गाडी खाली जाऊन मृत्यू झाला होता. त्याला कारण कचराच होते. त्यांच्या समोर जाणाऱ्या दुचाकीस्वाराने गाडीवरूनच कचरा टाकल्याने त्यांची गाडी स्लीप होऊन ते अवजड वाहनाखाली आले होते. त्यामुळे या रस्त्यात कडेला टाकन्यात येणारा कचरा हा लोकांचा बळी घेत आहे