धनकवडी : मांगडेवाडी येथील दगडाच्या खाणीत महिलेला ढकलून हत्या करण्यात आली होती. संशयित अवस्थेत आढळून आलेल्या या महिलेच्या मृत्यूचे गुढ उलगडे असून महिलेवर आधी बलात्कार करून तिला दगडाच्या खाणीत ढकलून खून करण्यात आला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन अंतर्गत ही धक्कादायक घटना घडली.
पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होताच या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस आणि गुन्हे शाखा पोलिसांनी सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. केशव चौधरी, सोन्या पवार, अब्दुल शेख, साई पुजारी, सोहल खान, (सर्व वय २० वर्षे,) महादेव भोराडे, (वय ४० वर्षे ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी या महिलेला जबरदस्तीने रिक्षात बसवून निर्जन स्थळी नेले. तिला काठीने मारहाण केली आणि नंतर एकाने तिला खाणीत ढकलून दिले. सीसीटीव्हीमधे ओळखले जाऊ नये म्हणून आरोपींनी रिक्षाचे हूड देखील बदलले होते.
Web Summary : A woman was murdered near Bharti Vidyapeeth, Pune, after being forced into a rickshaw, beaten, and thrown into a quarry. Police suspect rape and have arrested three suspects, known criminals who altered their rickshaw to avoid CCTV detection.
Web Summary : पुणे के भारती विद्यापीठ के पास एक महिला की हत्या कर दी गई। उसे जबरदस्ती रिक्शा में डालकर, पीटा गया और खदान में फेंक दिया गया। बलात्कार का संदेह है। पुलिस ने तीन संदिग्धों को गिरफ्तार किया, जो अपराधी हैं। उन्होंने सीसीटीवी से बचने के लिए रिक्शा बदला।