Pune Crime: महिलेचा विनयभंग करून मारहाण; नारायणगाव परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 11:56 IST2023-07-06T11:46:40+5:302023-07-06T11:56:52+5:30

तू आमची सोसायटीचे नाव सातबारावर का लावून देत नाही या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी करू लागले...

Woman molested and beaten; Incidents in Narayangaon area pune latest crime | Pune Crime: महिलेचा विनयभंग करून मारहाण; नारायणगाव परिसरातील घटना

Pune Crime: महिलेचा विनयभंग करून मारहाण; नारायणगाव परिसरातील घटना

नारायणगाव (पुणे) : सोसायटीचे नाव सातबारावर का लावून देत नाही या कारणावरून महिलेला शिवीगाळ व दमदाटी करीत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एका इसमावर विनयभंग सह सहा महिलांवर मारहाणीचा गुन्हा नारायणगावपोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली आहे.

याप्रकरणी ३३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ताटे यांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी या सोसायटीत महिलांशी बोलत असताना याठिकाणी वरील सात जण आले. तू आमची सोसायटीचे नाव सातबारावर का लावून देत नाही या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी करू लागले. दरम्यान त्यातील एका इसमाने फिर्यादीला पाठीमागून मिठी मारून मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आणि सर्वांनी शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धनवे हे करीत आहेत.

Web Title: Woman molested and beaten; Incidents in Narayangaon area pune latest crime