Pune: पुणे - नगर रस्त्यावर लक्झरी बसची धडक बसून महिलेचा मृत्यू, तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 15:36 IST2023-11-21T15:35:12+5:302023-11-21T15:36:48+5:30
पुणे बाजूने अहमदनगरच्या दिशेने वेगाने आलेल्या लक्झरी बस चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याचे कडेला....

Pune: पुणे - नगर रस्त्यावर लक्झरी बसची धडक बसून महिलेचा मृत्यू, तिघे जखमी
शिक्रापूर (पुणे) :पुणे-नगर रस्त्यावरील शिक्रापूर (ता. शिरुर) येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कुटुंबाला लक्झरी बसची धडक बसून महिलेचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले आहेत. रशिदा प कासम शेख (वय ४५, रा. पेरणे फाटा ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर जावेद कासम शेख (वय २८), सना जावेद शेख (वय २४), व इरम जावेद शेख (वय १ वर्षे तिघे रा. पेरणे फाटा, ता. हवेली), असे जखमींची नावे आहेत.
शिक्रापूर येथील पुणे-नगर महामार्गावरून शब्बीर शेख व जावेद शेख हे दोघे त्यांच्या जवळील दुचाकीहून महिला व लहान मुलीला घेऊन चाललेले असताना मुलीला भूक लागल्याने सर्वजण रस्त्याचे कडेला थांबलेले होते. यावेळी पुणे बाजूने अहमदनगरच्या दिशेने वेगाने आलेल्या लक्झरी बस चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याचे कडेला बसलेल्या लोकांना धडकली.
यावेळी झालेल्या अपघात दरम्यान बसचालक बस रस्त्याच्या कडेला सोडून पळून गेले. याबाबत शब्बीर रसूल मुलाणी (रा. करडे ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश करपे हे करीत आहेत.