फुरसुंगी पुलावर टँकरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, पतीसह 2 मुले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 10:52 IST2020-12-31T10:50:26+5:302020-12-31T10:52:06+5:30
Pune Accident : पती आणि दोन मुले जखमी झाले आहेत.

फुरसुंगी पुलावर टँकरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, पतीसह 2 मुले जखमी
पुणे - हडपसर येथील फुरसुंगीकडे जाणार्या मंचरवाडी पुलावर भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. भारत पेट्रोलियमच्या या टँकरच्या दोन्ही चाकांमध्ये ही महिला सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पती आणि दोन मुले जखमी झाले आहेत.
लक्ष्मी प्रमोद मालुसरे (वय ३२) असे या महिलेचे नाव आहे. पती प्रमोद मालुसेर (वय ३८) हे गंभीर जखमी झाले आहेत. मालुसरे कुटुंब फुरसुंगी येथे राहतात. ते गुरुवारी सकाळी दुचाकीवरुन भोर येथे जात होते. मंचरवाडी पुलावरुन जात असताना पाठीमागून आलेल्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्या मागे बसलेल्या लक्ष्मी या टँकरच्या चाकाखाली आल्या. त्यांच्या अंगावरुन चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रमोद मालुसरे व दोन मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर टँकरचालक पसार झाला असून हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.