टास्क कामाचे बहाण्याने महिलेला नऊ लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Updated: October 25, 2023 16:05 IST2023-10-25T16:05:05+5:302023-10-25T16:05:21+5:30
हडपसर पाेलीस ठाण्यात अज्ञात माेबाईल क्रमांक धारक, विविध बँक खातेधारक यांचेवर गुन्हा दाखल

टास्क कामाचे बहाण्याने महिलेला नऊ लाखांचा गंडा
पुणे : टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील काळेपडळ येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार तक्रारदार महिलेला अज्ञात व्यक्तीने माेबाईलवर संर्पक साधला. त्यानंतर वर्क फ्राॅम हाेम देण्याचे अमिष दाखवले. त्याकरिता टेलिग्राम ग्रुपवर त्यांना जाॅईन करुन घेत, वेगवेगळे टास्क दिले. टास्क पूर्ण केल्यास माेठया प्रमाणात परतावा देवू असे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेगवेगळी कारणे सांगून तब्बल ९ लाख ३३ हजार रुपये उकळले. सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर काेणताही परतावा न देता त्यांची फसवणुक केली. याप्रकरणी हडपसर पाेलीस ठाण्यात अज्ञात माेबाईल क्रमांक धारक, विविध बँक खातेधारक यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.