दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या; कोंढवा परिसरातील घटना
By नितीश गोवंडे | Updated: September 1, 2023 17:38 IST2023-09-01T17:37:51+5:302023-09-01T17:38:14+5:30
याप्रकरणी संतोष भारस्कर (३०) याच्यासह अन्य दोन जणांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या; कोंढवा परिसरातील घटना
पुणे : नवरा सतत दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने, तसेच दारू पिऊन तो त्रास देत असल्याने पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कात्रज-कोंढवा परिसरातील गोकुळनगर येथे घडली. निशा संतोष भारस्कर (२५, रा. गोकुळनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संतोष भारस्कर (३०) याच्यासह अन्य दोन जणांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाम ठोंबरे (३८, रा. अंबड, जि. जालना) यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशा आणि संतोष यांच्या २०१७ साली लग्न झाले होते. संतोष सतत दारूचे सेवन करून निशाला मारहाण करत माहेरून २५ हजार रुपये आणण्यासाठी त्रास देत होता. पैसे न आणल्यास घरातून हाकलून देण्याची धमकी त्याने निशाला दिली होती. या सततच्या छळाला कंटाळून ३१ ऑगस्ट रोजी घरात गळफास घेत निशाने आत्महत्या केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विकास बाबर हे करत आहेत.