शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीशी गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू; अपघातानंतर टेम्पोचालक पसार

By नितीश गोवंडे | Updated: November 11, 2024 16:10 IST

कात्रज घाटातून पुण्याकडे निघालेल्या भरधाव टेम्पोने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिलेला धडक दिली, महिलेचा पतीही जखमी

पुणे : मैत्रिणीबरोबर गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाला. या अपघातात एक दाम्पत्यदेखील जखमी झाल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रज भागात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पो चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दीपाली वैभव बर्गे असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातात पर्वती आदिनाथ वायदंडे (५०, रा. साईराज बिल्डिंग, मांगडेवाडी, कात्रज) आणि त्यांचे पती आदिनाथ जखमी झाले. पर्वती यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपाली, त्यांची मैत्रीण पर्वती, पती आदिनाथ शनिवारी (दि. ९) रात्री आठच्या सुमारास कात्रज भागातील मांगडेवाडी परिसरात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी कात्रज घाटातून पुण्याकडे निघालेल्या भरधाव टेम्पोने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दीपाली यांना धडक दिली. पर्वती आणि त्यांचे पती आदिनाथ यांना धडक देऊन टेम्पोचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला.

अपघातानंतर नागरिकांनी दीपाली, पर्वती आणि त्यांचे पती आदिनाथ यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दीपाली यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पाे चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी कात्रज भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलिस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यूWomenमहिलाbikeबाईकPoliceपोलिस