भोंदू बाबाने केली महिलेची फसवणूक
By Admin | Updated: July 13, 2016 10:14 IST2016-07-13T10:14:31+5:302016-07-13T10:14:31+5:30
घरातील अडचणी, संकट दूर करीन असा दावा करुन तीन महिलांना फसवणा-या भोंदू बाबांचा फरासखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

भोंदू बाबाने केली महिलेची फसवणूक
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १३ - घरातील अडचणी, संकट दूर करीन असा दावा करुन तीन महिलांना फसवणा-या भोंदू बाबांचा फरासखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका जागरुक महिलेने दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.
सापळा रचून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र जादूटोना विरोधी कायद्यानुसार गुन्हा दखल करण्यात आला आहे.