पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या विरहात काही तासांतच पतीनेही सोडले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 13:03 IST2022-05-03T13:02:52+5:302022-05-03T13:03:37+5:30
इंदापूर तालुक्यातील बावडा गावामधील घटना...

पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या विरहात काही तासांतच पतीनेही सोडले प्राण
नीरा नरसिंहपूर (पुणे) : पती-पत्नीचे नाते हे जगातील सर्वांत घट्ट नाते मानले जाते. लग्नाची गाठ बांधतानाच ते एकमेकांसोबत जगण्याची आणि सुख दुःखात शेवटपर्यंत साथ देण्याचे वचन घेतात. मात्र, मृत्यूनंतरही एकमेकांची साथ दिलेल्या पती-पत्नीच्या घटना तुम्ही क्वचितच ऐकल्या असतील; पण अशी घटना घडली आहे इंदापूर तालुक्यातील बावडा गावामध्ये या घटनेत पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या विरहात काही तासांनंतरच पतीनेही प्राण सोडले.
७७ वर्षांच्या हवई हनुमंत कांबळे यांचे शनिवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. ही घटना त्यांचे ८२ वर्षांचे पती हनुमंत कांबळे यांना कळताच त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. गेल्या अनेक दिवसांपासून वृद्धापकाळातील अनेक व्याधींना धैर्याने तोंड देणाऱ्या हनुमंत यांचा धीर तुटला आणि चौदा तासांत सायंकाळी हनुमंत यांनी पत्नीच्या विरहात प्राण सोडले.
हवई आणि हनुमंत हे दोघे बावडा गावातील रहिवाशी असून सुमारे पन्नास वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. अत्यंत गरीब परिस्थितीत दोघांनी एकमेकांना साथ देत संसाराचा गाडा मोठ्या कष्टाने ओढला.