पुणे : ख्रिसमस पार्टी करण्याची बतावणी करून १३ वर्षीय शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला काळेपडळ पोलिसांनीअटक केली. कुतबुद्दीन अली महंमद (७२, रा. महंमदवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने हडपसरमधील काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महंमद हा महंमदवाडीतील एका सोसायटीत राहायला आहे. तक्रारदार महिला याच सोसायटीत राहायला आहे.
बुधवारी (दि. २४) रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी ज्येष्ठ नागरिकाने मुलीला त्याच्या घरी बोलावून घेतले. ‘ख्रिसमस पार्टी करायला घरी येशील का? तुला चाॅकलेट देतो’, असे आमिष त्याने मुलीला दाखवले. त्यानंतर मुलीला घरात बोलावून घेतले. घराचा दरवाजा बंद करून त्याने मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निंबाळकर करत आहेत.
तरुणीशी अश्लील कृत्याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा
पादचारी तरुणीशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका २२ वर्षीय तरुणीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी २२ डिसेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास जेवण करून शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यावेळी दुचाकीस्वार आरोपीने पादचारी तरुणीशी अश्लील कृत्य केले. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी पसार झाला. पोलिस उपनिरीक्षक पद्मराज गंपले पुढील तपास करत आहेत.
पादचारी महिलेचा विनयभंग
पादचारी महिलेशी अश्लील कृत्य करून तिला धमकावल्याप्रकरणी एकाविरुद्ध लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, बलराज संदुपटला (रा. संगमवाडा, भवानी पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार महिला लष्कर भागात कामाला आहेत. त्या २३ डिसेंबर रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास कामावरून घरी निघाल्या होत्या. त्यावेळी आरोपीने महिलेला अडवले. ‘तू चारित्र्यहीन आहे,’ असे बोलून त्याने महिलेचा विनयभंग केला. ‘तुझ्या मुलांना खोट्या पोलिस केसमध्ये अडकवतो,’ अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी महिलेचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. अखेर आरोपीच्या त्रासामुळे घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिस हवालदार धायगुडे पुढील तपास करत आहेत.
Web Summary : Pune: An elderly man was arrested for sexually abusing a 13-year-old girl after luring her with chocolate and a Christmas party. Separately, a biker was booked for harassing a woman, and another man for verbally abusing and threatening a woman in separate incidents.
Web Summary : पुणे: एक बुजुर्ग को 13 वर्षीय लड़की को चॉकलेट और क्रिसमस पार्टी का लालच देकर यौन उत्पीड़न करने के आरोप में गिरफ्तार किया गया। अलग-अलग घटनाओं में, एक बाइकर पर एक महिला को परेशान करने और एक अन्य व्यक्ति पर एक महिला को मौखिक रूप से गाली देने और धमकी देने का मामला दर्ज किया गया।