चंद्रकांत पाटलांची वाट खडतरच ; नाेटाला मतदान करणार असल्याचे लागले बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 15:15 IST2019-10-03T15:14:03+5:302019-10-03T15:15:14+5:30
चंद्रकांत पाटील यांच्या विराेधात पुन्हा बॅनरबाजी. त्यामुळे पाटील यांना काेथरुडकर स्विकारणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

चंद्रकांत पाटलांची वाट खडतरच ; नाेटाला मतदान करणार असल्याचे लागले बॅनर
पुणे : पुण्यातील काेथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काेथरुडमधून उमेदवारी देण्यात आल्याने अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली हाेती. सुरुवातीला आमचा आमदार काेथरुडचा हवा असे लिहीलेले बॅनर काेथरुडमध्ये लावण्यात आले हाेते अन आता पुन्हा बॅनरबाजी करत पाटील यांच्या उमेदवारीला विराेध करण्यात आला आहे. काेथरुड विधानसभेला 100 टक्के मतदान नाेटाला करणार अशा आशयाचा बॅनर आता काेथरुडमध्ये लावण्यात आला आहे.
2014 च्या विधानसभेच्या निवडणूकीत काेथरुडमधून मेधा कुलकर्णी या माेठ्या मताधिक्याने निवडूण आल्या हाेत्या. गेल्या पाच वर्षात त्यांनी काेथरुडमध्ये पक्षाची चांगली बांधणी केली हाेती. यंदा या भागातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे मेधा कुलकर्णी या देखील नाराज हाेत्या. अखेर काल काेथरुडमध्ये भाजपाच्या झालेल्या मेळाव्यात हजेरी लावत पक्षासाेबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाठीत खंजीर खुपसले तरी भाजपाचा विजय असाे अशी घाेषणा देईल असे त्या मेळाव्यात म्हणाल्या. तसेच पाटील यांना बहुमताने निवडूण आणणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले.
दुसरीकडे युतीत शिवसेनेकडे असलेला काेथरुड मतदारसंघ यंदा भाजपाला देण्यात आल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजी आहे. चंद्रकांत माेकाटे या भागातील आमदार राहिले आहेत. युतीत काेथरुडची जागा शिवसेनेला मिळेल अशी आशा शिवसैनिकांना हाेती. पाटील यांची उमेदवारी जाहीर हाेताच मतदारसंघामध्ये दुरचा नकाे घरचा हवा आमचा आमदार काेथरुडचा हवा असे लिहीलेले बॅनर लावण्यात आले हाेते. आणि आता पुन्हा काेथरुडमध्ये 100 टक्के मतदान नाेटा ला करणार असल्याचा बॅनर लावण्यात आल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे येत्या निवडणूकांमध्ये काेथरुडकर चंद्रकात पाटील यांना स्विकारणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.