शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विठुरायाचा आषाढी पालखी सोहळा यंदा पायी की मागच्या वर्षीप्रमाणेच होणार? उद्याच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 20:07 IST

कोरोना विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी लक्षात घेता यंदा आषाढीची पायी वारी आणि नेहमीचे पालखी सोहळे कसे पार पाडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देउपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या बैठक

पुणे : राज्यासह देश विदेशातील लाखो भक्तांना ओढ लागलेल्या व  संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या पुणे जिल्ह्यातील संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे नियोजन कण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवार (दि.28) रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

कोरोना विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी लक्षात घेता यंदा आषाढीची पायी वारी आणि नेहमीचे पालखी सोहळे कसे पार पाडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  त्यात संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराममहाराज संस्थानसह राज्यातील प्रमुख संस्थानांनी आषाढी वारीबाबत प्रस्ताव ठेवले आहेत. यावर या वेळी चर्चा होणार आहे. यंदा आषाढी एकादशीचा सोहळा 20 जुलै 2021 रोजी साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी गतवर्षी राज्यातील संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत चांगावटेश्वर व माता रुक्मिणी या मानाच्या 9 पालख्यांना एसटी बसने वन डे वारीला शासनाने परवानगी दिली होती.

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी एसटी बसने आषाढी यात्रेला पालखी सोहळे आणावे लागल्यानंतर यंदा मात्र पायी पालखी सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. कोरोनाचे निर्बंध चालतील मात्र बंदी नको, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. उद्या राज्याचे  उपमुख्यमंत्री अजित पवार हे देहू, आळंदी आणि इतर मानाच्या सात पालखी सोहळा संस्थांशी चर्चा करणार असून यातून मार्ग निघेल अशी वारकरी संप्रदायाला अपेक्षा आहे.

यंदा 20 जुलै रोजी आषाढी एकादशी असून 1 जुलै रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तर 2 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान आहे. मात्र, अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याने मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यात सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात देखील कोरोनाची साथ असल्याने यंदा आषाढी यात्रा कशी घ्यायची हा पेच सरकारच्या पुढे आहे.-----

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील उद्या पुणे दौऱ्यावर; पालखी सोहळा नियोजन बैठकीत होणार सहभागी

सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील शुक्रवारी( दि. २८) पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. दुपारी साडे बारा वाजता ते साखर आयुक्त कार्यालयात येणार आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारीसंबंधी नियोजन बैठकीत ते सहभागी होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेAshadhi Ekadashiआषाढी एकादशीcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवारPandharpur Wariपंढरपूर वारीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा