पुणे पोलिसांच्या विरोधात ५० कोटींचा दावा ठोकणार: खेवलकर यांच्या वकीलांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:50 IST2025-07-30T14:49:25+5:302025-07-30T14:50:49+5:30
प्रांजल खेवलकर पहिल्या रिमांड रिपोर्टमध्ये हा सराईत गुन्हेगार असल्याची देखील खोटी माहिती पोलिसांकडून देण्यात आली

पुणे पोलिसांच्या विरोधात ५० कोटींचा दावा ठोकणार: खेवलकर यांच्या वकीलांचा इशारा
पुणे : पुण्यातील खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासहीत ४ जणांना २ दिवसाची पोलीस कोठडी तर ईशा सिंग आणि प्राची शर्मा यांना या २ महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रांजल खेवलकर, निखील पोपटाणी, समीर सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद यादव यांना २ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर ईशा सिंग आणि प्राची शर्मा यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. यावेळी हा सगळं ट्रॅप असल्याचे सांगत खेवलकर यांच्या वकिल विजयसिंह ठोंबरे यांनी पुणेपोलिसांना इशारा दिला आहे. त्यांच्या विरोधात ५० कोटींचा दावा ठोकणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
ठोंबरे म्हणाले, कालचा जो पोलिसांचा रिमांड रिपोर्ट पाहिला. त्याच्यानंतर आमची शंभर टक्के खात्री झाली की, हे पूर्णपणे अडकवण्यासाठी बनावट प्रकार करण्यात आलेला आहे. हा एक ट्रॅप होता. आणि त्यामध्ये प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यात आलेलं आहे. ज्या व्यक्तींनी कोकेन आणलं त्यांना बक्षीस म्हणून न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आणि आज ज्या पद्धतीतून ज्यांचा काही संबंध नाही. ज्यांनी काही घेतलं नव्हतं किंवा ज्यांनी अशा प्रकारे कुठलेही प्रकार केले नव्हते त्यांच्याकडं कोकेन कुठून आणले याचा तपास केला जातोय. अशा खोट्या कारवाईंचा आता आम्ही निषेध करून म्हणजे चुकीचं आहे. याच्या समर्थनार्थ आम्ही सदरची बाब ही एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात तर शंभर टक्के जाणार आहोत. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे प्रांजल खेवलकर पहिल्या रिमांड रिपोर्टमध्ये हा सराईत गुन्हेगार आहे. अशी देखील खोटी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. त्याच्यासाठी देखील आम्ही पन्नास कोटीचा दावा ठोकणार आहोत.