शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची लस येणार, टोचून घ्यायची की नाही? संभ्रम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात जवळपास ९० हजार डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीसाठी नोंदणी केली आहे. पण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात जवळपास ९० हजार डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीसाठी नोंदणी केली आहे. पण नोंदणी करूनही काहींच्या मनात लस घ्यायची की नाही याबाबत संभ्रम आहे. लसीच्या मानवी चाचण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत. त्यामुळे त्याची सुरक्षितता आणि परिणामांबाबत माहिती नाही. शिवाय ९-१० महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या सेवेत असल्याने भीती उरलेली नाही. त्यामुळे लसीबाबत फारशी उत्सुकता राहिली नसल्याच्या प्रतिक्रिया आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ऐकू येत आहेत.

लसीकरणासाठी जिल्ह्यात एकूण १ लाख १० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी डिसेंबरअखेर सुमारे ८९ हजार जणांनी नोंदणी केली आहे. हे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक आहे. केंद्र सरकारने नुकतीच दोन लसींच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या पहिल्या टप्यातील लसीकरणाला लवकरच आरंभ होईल. याबाबत अनेकांना उत्सुकता असली तरी काही जणांमध्ये संभ्रम आहे.

काही रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी याबाबत संवाद साधण्यात आला. “नाव नोंदविले असले तरी लस घेण्याबाबत ठरविले नाही. सुरूवातीपासून मी कोरोना रुग्णांची सेवा करत आहे. अद्याप एकदाही ‘पॉझिटिव्ह’ आले नाही. आता पूर्वीप्रमाणे लसीची उत्सुकता नाही. त्याची परिणामकारकता किती दिवस राहील, हेही माहिती नाही,” असे एका परिचारिकेने सांगितले. काही डॉक्टरांनी लसीसाठी नोंदणीच केलेली नाही. यापैकी एकांनी स्पष्टपणे सांगितले की, आता आम्ही कोरोनासोबत जगायला शिकलो आहोत. योग्य काळजी घेतली तर लसीची गरज नाही.

चौकट

सुरक्षिततेबाबत जाहीर करावे

“लसीबाबत डॉक्टर, कर्मचाऱ्यात उत्सुकता आहे. काही जणांच्या मनात भीतीही आहे. लसीची सुरक्षितता, त्याचे परिणाम, लसीचा खरच उपयोग होईल का, याबाबत काही लोक संभ्रमात आहेत. ‘केंद्र सरकारने अधिकृतपणे ही लस सुरक्षित असल्याचे जाहीर करावे. तसेच लसीचे काही विपरीत परिणाम झाल्यास ही शासनाची जबाबदारी असेल,’ याची ग्वाही द्यावी, असी काहींची मागणी आहे. त्यानंतच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या मनातील भीतीही नाहीशी होईल. लस घेणे हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे मानून बहुतेक सदस्यांची नोंदणी केली आहे.”

- डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र

चौकट

वैद्यकीय कर्मचारी संभ्रमात

मागील नऊ-दहा महिन्यांपासून कोरोना रुग्णांची सेवा करत आहोत. काही जणांना कोरोना होऊनही गेला. अनेकांना त्याची जाणीवही झाली नाही. त्यामुळे मनात कोरोनाची भीती नाही. परिणामी लसीबाबत पूर्वीसारखी उत्सुकता नाही. लसीचे काही परिणाम होत असल्याचे बातम्या येत आहेत. प्रतिकारशक्ती किती दिवस टिकणार, हेही माहिती नाही. त्यामुळे लस घ्यायची की नाही, याबाबत संभ्रम असल्याचे काहींचे म्हणणे आले. एका परिचारिकेने लसीबाबत उत्सुकता नसली तरी लस घेणार असल्याचे सांगत इतरांनाही आवाहन केले.

चौकट

लस घेणार नाही

एका डॉक्टरांनी लस घेणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. मास्क आणि हातांची स्वच्छता व अन्य काळजी घेत असल्याने लसीची गरज वाटत नाही. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने तो जीवावर बेतणारा नाही. ज्येष्ठ नागरीक, अन्य आजार असलेल्यांना धोका आहे. त्यामुळे मला लस घेण्याची गरज वाटत नाही, असे एका डॉक्टरांनी स्पष्ट केले.

चौकट

लसीसाठी झालेली नोंदणी (डिसेंबरअखेर)

एकूण आरोग्य कर्मचारी - १,१०,४३४

शासकीय - २६,२०९

खासगी - ८४,२२५

एकूण नोंदणी - ८९,०७४

शासकीय - २२,२५५

खासगी - ६६,८१९

------------------------