शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव होरपळताहेत!

By admin | Updated: January 14, 2015 03:13 IST

जाळपट्टे काढण्यासाठी या वर्षीही वनविभागाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने मावळ, मुळशी, खेड तालुक्यांतील काही भागातील वनक्षेत्र वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडू लागले आहे.

अंकुश जगताप, पिंपरीजाळपट्टे काढण्यासाठी या वर्षीही वनविभागाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने मावळ, मुळशी, खेड तालुक्यांतील काही भागातील वनक्षेत्र वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडू लागले आहे. उशिरा निधी मंजूर करून खर्चाचे कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पिंपरी - चिंचवड शहरालगत असणाऱ्या मावळ, तसेच मुळशी तालुक्यांत निसर्गसंपन्न असे निमसदाहरित प्रकारातील वनक्षेत्र आहे. मावळ वनपरिक्षेत्राच्या अखत्यारित ११ हजार ५०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. मुळशीतील पौड वनपरिक्षेत्र ८ हजार २५९.४५ हेक्टरवर आहे. त्यामधील गवत आता वाळले आहे. शेती खरेदी करणारे बाहेरचे शेतकरी तसेच, व्यावसायिक हे जमीन सपाटीकरणासाठी जागेतील गवत व झाडोरा पेटवून देतात. या आगीमुळे लगतच्या वनक्षेत्रात वणवे लागत आहेत. भातखाचरांमध्ये बियाणे पेरणीसाठीच्या जागेची माती भाजण्याचे (राब लावणे) प्रकार शेतकरी करतात. काहीजण वरई, नाचणीची बांधावर, डोंगर उतारावर लागवड करण्यासाठी झुडपे तोडून गवत पेटवून देतात. यासह वनक्षेत्रात भटकंतीसाठी जाणारे अनेक पर्यटक जेवणावळीसाठी चूल पेटवितात. बहुतेक वनक्षेत्रातून रस्ता तसेच, रेल्वेमार्गाने जाणारे प्रवासी गाडी थांबल्यावर सिगारेट पेटविण्यासाठी वापरलेली पेटती काडी वनक्षेत्रात टाकतात. परिणामी वणवे भडकत आहेत. मावळच्या पश्चिम भागात, मुळशी, खेड व लगतच्या भागात वणवे लागत आहेत. जाळपट्टे काढल्यास वणव्याची आग नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते. त्यासाठी वनविभागाकडून निधी मंजूर होतो. हा निधी डिसेंबरपर्यंत वनपरिक्षेत्रांपर्यंत उपलब्ध झाल्यावर वनकर्मचारी तसेच, मजुरांकरवी जाळपट्टे काढले जायचे. मात्र रोजंदारीचा दर कमी असल्याने मजूर मिळणे कठीण झाले.