शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पत्नीचा गळा दाबून केला खून; मृतदेह साडीत गुंडाळून दिला फेकून, पोलिसांनाही केला स्वतःच फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 13:32 IST

विवाहानंतर पतीसह सासरकडील लोकांनी शारिरिक व मानसिक त्रास देण्यास सुरवात केली

लोणी काळभोर : चारित्र्यावर संशयावरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह साडीत गुंडाळुन कात्रज बायपास रोडच्या पलीकडे मोकळ्या प्लॉटमध्ये कंपाऊंडच्या आत टाकून दिला आहे. सदर घटना मंतरवाडी  (ता हवेली) येथे घडली आहे. पतीस अटक करण्यात आली आहे.  

विदया राहुल फडतरे हिचा खून केल्याप्रकरणी तिचा पती राहुल ज्ञानोबा फडतरे (वय ३२, मुळ रा. गणेशवाडी, बोपगांव, ता. पुरंदर. सध्या रा. मंतरवाडी, देवाची ऊरूळी, ता हवेली) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मयत विद्या हिचे वडील दत्तात्रय कृष्णा शेडगे (वय ५०, रा. परिंचे ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सात वर्षांपूर्वी विदया हिचा विवाह राहुलशी झाला. एक वर्षानंतर तिला पतीसह सासरकडील लोकांनी शारिरिक व मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. त्याबाबत सासवड पोलीस ठाण्यात वेळोवेळी तक्रारी दिलेल्या आहेत. तीन वर्षापुर्वी त्यांना मुलगा झाला. सुमारे एक वर्षापुर्वी सासरकडील लोकांनी विदया हिस चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करून त्रास दिल्याबाबत तीने पती व सासरकडील लोकांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यावेळी सासवड पोलीसांनी गुन्हा नोंद करून कारवाई केलेली आहे. त्यानंतर सन २०२९ मध्ये पती व सासरकडील लोक हे तिचे माहेरी गेले व मुलीस नांदावयासं पाठवुन दया. आंम्ही त्रास देणार नाही असे म्हणाले त्यानंतर विद्या सासरी गेली. 

सोमवार (२१ मार्च रोजी) रात्री १२-३० वाजण्याच्या सुमारास मंतरवाडी येथे राहुल याने विदयाचा गळा दाबुन खुन केला. तिचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर मृतदेह साडीत गुंडाळून हडपसर पोलीस ठाण्याच्या हददीत कात्रज बायपास रोडचे पलीकडे मोकळ्या प्लॉटमध्ये कंपाऊंडच्या आत टाकून दिला. मिळालेल्या माहितीनुसार खून केल्यानंतर आपल्यावर संशय येवू नये म्हणून राहूल याने सकाळी शहर पोलीस मुख्यालयाला फोन करून आपल्या पत्नीचा मृतदेह सदर ठिकाणी पडला असल्याची माहिती दिली. काही वेळाने हडपसर पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठवला. संशय आल्याने केलेल्या चौकशीत राहूल याने पत्नीचा खून आपण केला असल्याची कबुली दिल्याने त्याला अटक करून लोणी काळभोर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नDeathमृत्यू