पत्नीने सांगितले, "मला किराणा माल आणून द्या", संतापलेल्या पतीने थेट केले चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 12:13 IST2021-04-05T12:12:16+5:302021-04-05T12:13:11+5:30

तुम्हाला फक्त दारू प्यायला पाहिजे, असे बोलल्यावर संतापला पती

The wife said, "Bring me some groceries", the angry husband stabbed her directly | पत्नीने सांगितले, "मला किराणा माल आणून द्या", संतापलेल्या पतीने थेट केले चाकूने वार

पत्नीने सांगितले, "मला किराणा माल आणून द्या", संतापलेल्या पतीने थेट केले चाकूने वार

ठळक मुद्देसुरुवातीला मारहाण करून मग केला चाकूने वार

पिंपरी : किराणा माल संपला असून, तो आणून का देत नाही, तुम्हाला दारू प्यायचे व पार्टी करायचे समजते, असे पत्नी म्हणाली. त्याचा राग आल्याने पतीने तिच्यावर चाकूने वार केले. यात पत्नी जखमी झाली असून, याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. पिंपरीगाव येथे शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

मिनल संदीप शिंपी (वय २९, रा. पिंपरीगाव), असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीचे नाव असून, त्यांनी शनिवारी (दि. ३) याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संदीप सुनील शिंपी (वय ३३, रा. पिंपरीगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनल आणि संदीप हे पतीपत्नी आहेत. घरातील सर्व किराणा सामान संपले आहे. तुम्ही मला आणून देता का नाही. तुम्हाला फक्ता दारू प्यायची आणि पार्टी करायचे समजते, तुम्ही रात्री पण दारू पिऊन आला होता, असे मिनल संदीपला म्हणाली. पत्नीच्या या बोलण्याचा राग आल्याने संदीपने शिवीगाळ करीत पत्नीस हाताने मारहाण केली. त्यानंतर मिनल यांच्या दोन्ही हातातील बांगड्या फोडून त्यांचे डोके भिंतीवर आपटले. त्यानंतर कांदा कापण्याच्या चाकूने वार करून मिनल यांना जखमी केले.


 

Web Title: The wife said, "Bring me some groceries", the angry husband stabbed her directly