शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मदतीने पतीला नपुसंक बनविण्याचा पत्नीने आखला कट; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 18:49 IST

मोबाईल चॅटमुळे आला प्रकार उघडकीस

ठळक मुद्देवारजे पोलीस ठाण्यात पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : प्रियकराच्या मदतीने पतीला नपुसंक बनविण्याचा कट पत्नीनेच बनविण्याचा आखला होता. पण ही गोष्ट मोबाईल चॅट पाहिल्याने पतीला त्याचा वेळीच सुगावा लागला.याबाबत २७ वर्षाच्या पतीने वारजे माळवाडीपोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार वारजे पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबतची माहिती अशी, पत्नी ही मेकॅनिकल इंजिनिअर आहे. पुण्यातील एका कंपनीत काम करत असताना तिची त्याच कंपनीतील एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले. परंतु, लग्न करायला दोघांना अडचण होती. दोघेही वेगळे झाले. तिचे एका सॉफ्टवेअर इंजिनिअरशी लग्न झाले. मुळ गावी गेल्यावर ते वारजे येथे खोली घेऊन राहू लागले. एकाच कंपनीत असल्याने पत्नीचे प्रियकराबरोबर पुन्हा संबंध जुळले. त्यांनी पतीला जखमी करुन नपुसंक बनविण्याची योजना आखली. दरम्यान, ते हनीमूनला महाबळेश्वर येथे गेले होते. तेथे प्रियकरही आला. प्रियकरही त्याच परिसरात राहत असल्याने तेथे हे तिघे भेटले. त्यांनी पार्टी केली. त्यानंतर पत्नीने त्याची लॉकडाऊन नोकरी गेली. राहायलाही अडचणी असल्याचे सांगून त्याला आपल्या घरी राहायला बोलावले़. त्यानुसार तो या पती पत्नीच्या घरी राहायला आला. महाबळेश्वर येथील हनिमुनचे फोटो पाहण्यासाठी पतीने पत्नीचा मोबाईल पाहिला. तेव्हा त्याला काही फोटो संशयास्पद दिसले. रात्री सर्व जण झोपल्यावर त्याने त्या प्रियकराचा मोबाईल घेऊन त्यावरील चॅट पाहिले. तेव्हा त्याला धक्काच बसला. त्या या दोघांचे चॅटिंग होते. दोघांनी एक कट रचल्याचे त्याला आढळून आले. घरात चोरीचा बनाव करुन पतीच्या खासगी भागाची नस कापून त्याला नपुसंक बनविण्याची चर्चा त्या चॅटमध्ये केली होती. त्याला नपुसंक बनविल्यानंतर तिघांनीही एकत्र राहायचे असे दोघांच्या चॅटमध्ये होते.  या सर्व प्रकाराने पती प्रचंड घाबरला़ व त्याने कामानिमित्त बाहेरगावी जात असल्याचे सांगून मूळ गावी गेला. तेथे सर्व विचार केल्यानंतर तो पुन्हा पुण्यात आला व त्याने थेट वारजे माळवाडी पोलसांकडे जाऊन फिर्याद दिली आहे. 

टॅग्स :PuneपुणेWarje Malwadiवारजे माळवाडीmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस