शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी व प्रियकराने संगनमताने केला पतीचा खून; दोन तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 15:13 IST

पत्नीच्या प्रियकराकडून जीवाला धोका असलयाचे पती सतत सांगत होता

इंदापूर : अनैतिक प्रेमसंबंधास विरोध करणा-या पतीचा प्रियकराने केलेल्या खुनी हल्ल्यात मृत्यू झाला. या प्रकरणी त्याची पत्नी, प्रियकर व त्याचा साथीदार या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पिनेश उर्फ मयुर महेंद्र धाईंजे ( रा.टेंभुर्णीवेस नाका परिसर, इंदापूर),विजय नवनाथ शेंडे (रा. अंबिकानगर इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. ईश्वर भीमराव कांबळे (रा.टेंभुर्णीवेस नाका, इंदापूर) असे मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. त्याचे वडील भीमराव सुदाम कांबळे (वय ६० वर्षे, रा.आंबेगाव कुबेर प्रॉपर्टीज ता.हवेली जि. पुणे) यांनी फिर्याद दिली होती.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर हा फिर्यादी भीमराव कांबळे यांचा थोरला मुलगा होता. त्यास दोन मुले आहेत. दीड वर्षापुर्वी ईश्वरच्या पत्नीने सासरच्या लोकांबरोबर भांडण केले. त्यानंतर ती नवरा व मुलांसह आपल्या माहेरी बाभुळगाव ( ता. इंदापूर) येथे आली. काही दिवसानंतर ती नव-यासह इंदापूरमधील टेंभुर्णी वेस नाका परिसरात भाड्याच्या घरात राहू लागली. शेजारी राहणाऱ्या पिनेश उर्फ मयुर महेंद्र धाईंजे याच्याबरोबर तिचे अनैतिक संबंध निर्माण झाले. या संदर्भात ईश्वरने फिर्यादीस कल्पना दिली होती. ही बाब फिर्यादीने सुनेच्या आईवडिलांच्या कानावर घातली होती. पिनेशला ही समजावुन सांगितले होते. मात्र पिनेश किंवा त्या विवाहितेच्या वर्तनात काहीच फरक पडलेला नव्हता. ईश्वर ही पिनेशकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे सतत सांगत होता.    या पार्श्वभूमीवर दि.२३ ऑक्टोबरच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पिनेश धाईंजे व विजय शेंडे यांनी संगनमत केले. अनैतिक संबंधाच्या कारणावरुन घरी जाऊन ईश्वरबरोबर वाद घालून त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिनेशने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने ईश्वराच्या पोटावर वार करुन त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर ते तिघे ही तेथून निघुन गेले. जखमी ईश्वरला त्याच्या नातेवाईकांनी पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असताना आज (दि.२५) सकाळी त्याचा मृत्यू झाला.

गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासात अकलूज ( ता. माळशिरस, जि.सोलापूर) कडे पळालेल्या तीन ही आरोपींना इंदापूर पोलीसांनी पकडले. यातील विवाहिता जखमी असल्याने तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. फिर्याद दिल्यानंतर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता. त्यामध्ये बदल करुन खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. - दिलीप पवार, पोलीस निरीक्षक, इंदापूर पोलीस ठाणे

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारWomenमहिला