आमच्यासोबत का फिरत नाही विचारत टोळक्याची तरुणाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 18:12 IST2019-05-10T18:09:54+5:302019-05-10T18:12:02+5:30
क्षुल्लक कारणावरून झालेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच आमच्यासोबत का फिरत नाही असा प्रश्न विचारत तरुणाला मारहाण झाल्याची घटना पुण्यात घडली आहे.

आमच्यासोबत का फिरत नाही विचारत टोळक्याची तरुणाला मारहाण
पुणे : क्षुल्लक कारणावरून झालेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच आमच्यासोबत का फिरत नाही असा प्रश्न विचारत तरुणाला मारहाण झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. फक्त सोबत फिरत नसल्याचा राग मनात धरून टोळक्याने तरुणाला मारहाण केली असून या गुन्ह्यात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
या संदर्भात मुकेश वालोद्रा (वय २२,वारजे माळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. या संदर्भात कृष्णा मल्हारी गायकवाड (वय १९), अनिल गुरुनाथ सासवे (वय २५), नितीन उर्फ पप्पू लक्ष्मण पद्माकर (वय १९), आणि दोन विधीसंघर्षित बालक, आणि एक इतर एका व्यक्ती अशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वारजे माळवाडी भागात राहणारे मुकेश हे त्यांच्या घरी मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी काही तरुण तिथे आले आणि त्यांनी 'तू आमच्याबरोबर फिरत का नाहीस' असा प्रश्न विचारला. त्यांनतर या तरुणांनी कोयत्याने मुलक्ष यांच्या डोळ्याला, पाठीवर, डोक्यावर वार केले. तसेच दगड आणि विटांनी मारहाण करून जखमी केले. हा गोंधळ आणि आरडाओरडण्याचा आवाज आल्यावर आजूबाजूच्या लोकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही कोयत्याचा धाक दाखवण्यात आला. या प्रकरणी वारजे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक पी एस गायकवाड अधिक तपास करत आहेत.