शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

श्री क्षेत्र भीमाशंकरला 'डांकिन्याम भिमाशंकरम्' असं का म्हणतात? जाणून घ्या इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:36 IST

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग असून त्यास डांकिन्याम भिमाशंकरम् असे म्हणतात

भीमाशंकर: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्‍या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे तिसर्‍या सोमवारी लाखो भाविक भक्तांनी हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय असा जयघोष करत काहीसे ऊन रिमझिम पाऊस अशा वातावरणामध्ये पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले.        बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग असून त्यास डांकिन्याम भिमाशंकरम् असे म्हणतात. श्री क्षेञ भीमाशंकर येथे संहार झालेला आहे. शंकराने त्रिपुरासुराला या ठिकाणी वरदान दिले होते की, स्त्री पुरुष मारू शकणार नाही. म्हणून ञिपुरासुराने असुर रूप घेऊन त्रास देण्यास सुरुवात केली. म्हणून शंकराने पुन्हा अर्ध नारी नटेश्वर रूप धारण करुन कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुराचा संहार केला. शंकराने या ठिकाणी मोठं रूप घेतलं म्हणून याला भीमाशंकर म्हणतात. असुराला मारल्यानंतर अंगातून घाम आला त्या घामातून भीमा नदीची सुरुवात होती. या ठिकाणी भीमा नदीचा उगमस्थान आहे. डांकींनी  ही त्रिपुरासुराची पत्नी होती. शंकराने त्रिपुरासुराच्या पत्नीला आशीर्वाद दिला की, तुझा पतीला दिलेले वरदान मी पूर्ण करू शकलो नाही. परंतु तुझ्या नावाने एक क्षेत्र प्रसिद्ध होईल. त्या क्षेत्राला डांकिन्याम क्षेत्र असे म्हणतात. ञिपुरासुराची पत्नी डांकींन्या भीमा नदी व श्री शंकर म्हणून श्री क्षेत्र भीमाशंकरला डांकिन्याम भीमाशंकरम् असे म्हटले जाते अशी अख्यायिका आहे.         श्री क्षेत्र भीमाशंकर हे श्री क्षेञ भीमाशंकर व पविञ असे ज्योर्तिर्लींग आहे. दरवर्षी संपुर्ण श्रावण महिन्यामध्ये पविञ शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त येत असतात. गेल्या आठ ते दहा दिवसांपासुन ह्या भागामध्ये कडक असा उन्हाळा जाणवत आहे. निसर्ग सौंदर्य फुलले असुन जिकडे तिकडे धबधबे हे खळखळुन वाहत आहेत. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी व पविञ अशा शिवलिंगाचे दर्शन असा दुहेरी योग जुळुण  आला त्यामध्येच या वर्षी तिसर्‍या सोमवार लागुन सलग दोन दिवसाच्या सुट्ट्या आल्यामुळे श्री क्षेञ भीमाशंकर येथे दिवसांमध्ये सलग तीन दिवसांमध्ये सुमारे चार लाख भाविकांनी पविञ अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले. 

टॅग्स :PuneपुणेBhimashankarभीमाशंकरJyotirlingaज्योतिर्लिंगTempleमंदिरSocialसामाजिकhistoryइतिहास