शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धरण भरलेले असतानाही पाणीकपात कशासाठी  : डॉ. अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 21:25 IST

महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा पिंपरी-चिंचवड शहराला कधी पाणी टंचाई जाणवली नाही

ठळक मुद्देशहरातील पाणीपुरवठ्याचा घेतला आढावा

पिंपरी : पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या नियोजनात काय चुका केल्या आहेत, काय अडचणी आहेत आदींबाबत पाहणी करणार आहोत, असे सांगत असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा पिंपरी-चिंचवड शहराला कधी पाणी टंचाई जाणवली नाही. त्यावेळी पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसतानाही शहराला दररोज पाणीपुरवठा केला जात होता. आता मात्र पाणीकपात का होत आहे, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. खासदार डॉ. कोल्हे यांनी निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राला शनिवारी भेट दिली. या वेळी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक दत्ता साने आदी यावेळी उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, दोन वर्षांपूर्वी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. त्या वेळी कमी पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसतानाही योग्य नियोजनामुळे शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. परिणामी पाणी कपात न करता दरोरज पुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे, हे कसले नियोजन आहे, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. ह्यस्मार्ट सिटीह्णअंतर्गत अनेक कामे अर्धवट आहेत. ऑ प्टीकल फायबर लेईंगचे काम झाले आहे. मात्र, कव्हरिगंसाठी अनेक ठिकाणी फक्त मुरूम वापरला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीची कामे नक्की स्मार्टली होत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसDamधरणBJPभाजपा