Why does it take so long to issue panchnama when the damage caused by the storm is visible? Ajit Pawar | नुकसान समोर दिसत असताना पंचनामे काढायला वेळ लागतोच कशाला़? अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती 

नुकसान समोर दिसत असताना पंचनामे काढायला वेळ लागतोच कशाला़? अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती 

ठळक मुद्देपवार यांनी जुन्नरच्या तहसीलदारांच्या कार्यशैलीची उडवली खिल्ली 

जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जु्न्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांना जोरदार तडाखा दिला. या वादळी पावसाने शेतकºयांचे पीके, काहींच्या घरांचे असे अतोनात नुकसान केले. त्यात येणेरे येथील ठाकरवाडीमधील बाळू भालेकर यांच्या घर देखील वादळामध्ये उध्वस्त झाले.जुन्नर तालुक्यात वादळी फटका बसून झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गेले असता या कुटुंबाला त्यांनी ताई, तलाठी पंचनामे करायला आले होते का? हा प्रश्न विचारला. यावेळी तहसिलदार हनुमंत कोळेकर यांनी त्यांना प्राथमिक पाहणी केल्याचे सांगितले. यावर अजित पवार यांनी ‘कसली प्राथमिक पाहणी, मला तर काहीच कळेना.. हा शब्दच मी पहिल्यांदा समजला.. असे म्हणत कार्यशैलीचाच एकप्रकारे पंचनामा केला.तसेच पंचनामे करायला वेळ लागतोच कशाला असा सवाल उपस्थित करत तहसिलदाराला खडे बोल सुनावले. 
राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी चक्रीवादळाने नुकसान झालेल्या जुन्नर तालुक्याचा पाहणी दौरा करत नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट देखील घेतली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, तहसिलदार हनुमंत कोळेकर उपस्थित होते. 
पवार म्हणाले, इतक्या लांब येत सारखे एकदा ताईंचे रेकॉर्ड नंतर त्याचे रेकॉर्ड असे करत वेळ घालणे कितपत योग्य आहे़? घराचा पत्रा उडाला, शेतीचे नुकसान झाले हे असं सगळं चित्र समोर दिसत असताना पुन्हा पुन्हा पाहणीसाठी वेळ घालवणे ना तुम्हाला परवडण्यासारखे ना या नुकसानग्रस्त कुटुंबांना.. तसे दोन दिवसात सरकार दरबारी हे सगळी कामे मार्गी लागायला हवी होते, अशी टिप्पणी करत नाराजी व्यक्त केली. पवार यांनी यावेळी उज्जवला भालेकर यांचे सांत्वन करताना ताई ,मी राज्याचा उपमुख्यमंत्री, शिरुरचा खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके असे सर्व जण तुमच्याबरोबर आहोत. धीर सोडु नका ,असे प्रसंग येत असतात. यावेळी भालेकर यांनी मुलगी पोलीस प्रशिक्षण घेत असल्याची सांगितल्यावर तिला मदत करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.यावेळी लगेचच पवार यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना फोन करून या कुटुंबाला मदत करण्याच्या सुचना दिल्या.  पवारांच्या कार्यशैलीचा अनुभव यानिमित्ताने उपस्थितीतांना मिळाला  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Why does it take so long to issue panchnama when the damage caused by the storm is visible? Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.