शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानवर वर्चस्वाची संधी का गमावली? प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 11:26 IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची गरज नसताना मध्यस्थी झालीच होती तर, पाकिस्तानकडून पुन्हा भारतावर हल्ला होणार नाही असे वदवून का घेतले नाही?

पुणे: भारत-पाकिस्तान संघर्षात पाकिस्तानकडून नेहमीच होणारा दहशतवादाचा त्रास कायमचा मिटविण्याची संधी असताना युद्धबंदी करून ती का गमावली? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शुक्रवारी (दि.६) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना केला. यावेळी भारत-पाकिस्तानमधील संघर्षात तिसऱ्या देशाने म्हणजेच अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची गरज नव्हती. जर मध्यस्थी झालीच होती तर, पाकिस्तानकडून पुन्हा भारतावर हल्ला होणार नाही असे वदवून का घेतले नाही. जर पाकिस्तानचे हल्ले निष्फळ झाले, तर भारतीय हवाई दलाचे नुकसान झाले कसे? हे नुकसान अंतर्गत तोडफोडीमुळे झाले का? असे प्रश्नही उपस्थित केले.

पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर यांनी सिंगापूरमधील शांग्री-ला संवादात भारताचे संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी दिलेल्या वक्तव्याचा संदर्भ दिला. चौहान यांनी भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीय हवाई दलाची मालमत्ता नष्ट झाल्याची कबुली दिली होती. यावरून जाब विचारला की, जर पाकिस्तानचे हल्ले निष्फळ ठरले होते, तर भारताचे नुकसान कशामुळे झाले? हे प्रश्न केवळ राजकीय नसून, देशाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारे आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे झालेले नुकसान केवळ बाह्य हल्ल्यामुळे की अंतर्गत त्रुटींमुळे? यावर सरकारने स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचे सांगितले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून काढलेल्या तिरंगा विजय फेरीवर टीका करत, भाजप या मोहिमेचे श्रेय घेत असताना, सरकारकडून प्रत्यक्षात काय घडले, यावर पारदर्शक माहिती दिली जात नाही.

आंबेडकर यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या आधीच्या ब्रीफिंगची आठवण करून दिली, ज्यात सांगण्यात आले होते की, पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे भारताने निष्क्रिय केली. याच पार्श्वभूमीवर मग हवाई दलाचे नुकसान कसे झाले? हे नुकसान केवळ शत्रू पक्षामुळे झाले, की आतून कोणी तोडफोड केली? देशाच्या सुरक्षेसंबंधी इतका महत्त्वाचा मुद्दा असताना, पंतप्रधानांनी देशाला काहीही सांगितलेले नाही. त्यांनी देशाची दिशाभूल केली का? असा सवाल केला.

 

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकारairforceहवाईदलPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला