शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

प्रचंड ताकद उभारून देखील कांचन कुल यांना " बारामती " जिंकण्यात का आले अपयश..?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 7:06 PM

'' ह्या '' गोष्टींनी कुल यांच्या पराभवाला आणि सुळे यांच्या विजयाला हातभार लावला..

बारामती  : बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात असला तरी हा गड आम्ही जिंकणारच असा विश्वास व्यक्त करीत भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सुळे आणि कांचन यांच्यात ’कॉंटे की ट्क्कर’ पाहायला मिळाली. मात्र, भाजपला हा गड जिंकण्यात अपयश आले.  

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शेवटच्या काही टप्प्यात भाजपा प्रणित महायुती कुल यांच्या प्रचारात कमी पडल्याचे पाहायला मिळाले. हीच बाब सुळे यांच्या पथ्यावर पडली. तसेच सुळेंसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून दाखविलेली एकजूटही बारामतीतील विजयासाठी पूरक ठरली.त्यांनी सुरुवातीपासून जनसंपर्क; लोकांचे प्रश्न, समस्यांवर सोडविण्यावर भर देत दुष्काळी भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासही प्राधान्य दिले.त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत तरुणाईशी थेट संवाद ठेवला. गेली पाच वर्षे विविध कार्यक्रम व उपक्रमांनी मतदारसंघ पिंजून काढला होता.हि सगळी सुळे यांच्या विजयी हॅट्रिक मध्ये जमेच्या बाजू ठरल्या.  

गुरुवारी सकाळी आठ वाजता शासकीय गोदामात मतमोजणीस सुरूवात झाली. कांचन कुल यांनी आरंभापासून आघाडी घेतल्याने राष्ट्रवादीच्या कोटात अस्वस्थता पसरू लागली होती. दौंड हा कांचन कुल यांचा घरचा मतदारसंघ असल्याने त्यांना तिथे कुल यांना ६९५0 मते तर सुळे यांना २६५३ मते पडली. खडकवासल्यामध्येही त्या आघाडीवर होत्या. मात्र, बारामती, इंदापूर, भोर आणि पुरंदरमध्ये सुळे यांनी आघाडी घेतली.

पहिल्या आणि दुस-या फेरीमध्ये सुळे आणि कांचन कुल यांच्यात घासून लढत झाली. दुस-या फेरीत दौंड,खडकवासला आणि भोर, पुरंदरमध्ये कुल आघाडीवरच होत्या. दोन फेरींमध्ये सुळे यांना एकूण ५८ हजार ६२६ मते तर कुल यांना ५८ हजार ९१९ मते होती. दोघांच्या मतांमध्ये केवळ २९३ मतांचा फरक होता. कुल यांचे पारडे जड होते की काय असे वाटत असतानाच सुळे यांनी हळूहळू तिस-या फेरीनंतर मतांची आघाडी घेतली.सुळे यांनी पाचव्या फेरीनंतर आघाडी कायम राखली. दोघींच्या मतांमध्ये जवळपास १७00२ मतांचा फरक पडल्याचे दिसून आले. सातव्या फेरीमध्ये सुळे यांना एकूण २ लाख ११ हजार 0९१ तर कुल यांना १ लाख ८७ हजार ५६0 मते पडली. नवनाथ पडळकर यांना १३ हजार २00 मते पडल्याने आश्चर्य व्यक्त झाले. दहाव्या फेरीनंतर सुळे यांच्याच गळ्यात विजयाची माळ पडणार असे काहीसे चित्र निर्माण होऊ लागल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे वातावरण दिसू लागले. सुळे यांनी हळूहळू लीड घेण्यास सुरूवात केली. दहाव्या फेरीत एकूण २ लाख ९९ हजार ४0६ वरून पंधराव्या फेरीपर्यंत सुळे यांनी ४ लाख ५३ हजार ८0 पर्यंत मजल मारली. तर कांचन कुल यांना ३ लाख ५७ हजार ८४१ मते पडली. सुळे यांनी ९५ हजार २३९ मतांनी आघाडी घेतली. त्यानंतर सुळे यांचे मताधिक्य शेवटपर्यंत वाढतच गेले.. आणि बहुचर्चित तसेच भाजपाकडून प्रतिष्ठेची करण्यात आलेल्या बारामतीच्या लढतीत कुल यांना दीड लाखांहून अद्धिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला.. .........कांचन कुल यांच्या पराभवाची ५ कारणेमहाविद्यालयीन विद्यार्थी संघटना, तरूणाईशी संपर्क. सोशल मीडियाचा प्रभावी वापर ठरला राष्ट्रवादीसाठी निर्णायक.बहुतांश सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे तुलनेने राष्ट्रवादीचा अधिक जनसंपर्क आहे.राष्ट्रीय समाज पक्षाच्या तुलनेने सहकारी संस्थांवर पवार कुटुंबाचे वर्चस्व आहे.गेल्या ५ वर्षांपासून खासदार सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रभावी जनसंपर्क ठेवला. नवख्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा दौंड वगळता इतरत्र थेट जनसंपर्क कमी होता. ......................... 

टॅग्स :Baramatiबारामतीbaramati-pcबारामतीBJPभाजपाSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल