शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोरटकर हा चिल्लर माणूस तुम्हाला एक महिना का सापडत नव्हता? राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 17:20 IST

संवेदनशील विषयाला स्पर्श करून लोकांची माथी भडकवायची आणि आपलं अपयश लपवायचं, हे या पाठीमागचं कारण आहे

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंग्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली. तेलंगातून ताब्यात घेतल्यानंतर कोरटकरला घेऊन पोलिसांचे पथक आज, मंगळवारी सकाळी कोल्हापुरात पोचले. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता २८ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे. हा चिल्लर माणूस तुम्हाला एक महिना का सापडत नव्हता? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे असं शेट्टी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत. 

 

प्रशांत कोरटकरची तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी, संतप्त शिवप्रेमींना चकवा देत न्यायालयात केले हजर

शेट्टी म्हणाले, खरंतर मुख्यमंत्री म्हणतायेत की, कोरटकर चिल्लर माणूस आहे. हा चिल्लर माणूस तुम्हाला एक महिना का सापडत नव्हता? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. खरंतर कोरटकर असो, सोलापूरकर असो अशा प्रकारची माणसं जाणीवपूर्वक त्यांना वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी पेरणी केलेली आहे. कारण आज जे काय ज्वलंत प्रश्न आहेत. आज शेतकऱ्यांचे एफआरपी मिळत नाही. व सोयाबीन उत्पादकांचं सोयाबीन खरेदी केलं जात नाही. हरभरा खरेदी केंद्र सुरू होत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. दंगली घडतायेत, स्त्रिया सुरक्षित नाहीत. हे सारे जनसामान्यांचे जे काही प्रश्न आहेत. ते प्रश्न भलतीकडंच राहिले आहेत. लोकांना वळवण्यासाठी संवेदनशील विषयाला स्पर्श करून लोकांची माथी भडकवायची आणि आपलं अपयश लपवायचं. हेच याच्या पाठीमागचं कारण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.  

कोरटकरला पकडण्यात यश आलं 

प्रशांत कोरटकर तेलंगणाच्या दिशाने गेल्याचे एका टोलनाक्यावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्पष्ट झाले होते. कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात त्याचा शोध सुरू केला होता. मात्र महाराष्ट्र पासिंगच्या गाड्या पाहिल्यानंतर कोरटकर पुन्हा एकदा चकवा देण्याची शक्यता लक्षात घेऊन कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात तेथील दुचाकी भाड्याने घेतल्या. या दुचाकींवरून पोलिसांनी दोन ते तीन दिवस कोरटकरचा शोध घेतला. अखेर सोमवारी दुपारी तेलंगणा राज्यातील मंचरियाल येथील रेल्वे स्टेशनपासून त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं.

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीPoliceपोलिसBJPभाजपाPoliticsराजकारण