पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोरोना लसींच्या किमतीबाबत गप्प का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 12:38 PM2021-04-26T12:38:10+5:302021-04-26T15:06:07+5:30

आताचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेरचं, लस १५० रुपयांना द्या,

Why are the Prime Minister, Chief Minister and Deputy Chief Minister silent about vaccine rates? | पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोरोना लसींच्या किमतीबाबत गप्प का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोरोना लसींच्या किमतीबाबत गप्प का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

Next
ठळक मुद्देकोव्हिडंमुळे मी आठवड्याची मुदत देतो अन्यथा जिल्ह्याजिल्ह्यात धरणे आंदोलन करण्याचा इशारा

पुणे: देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामध्ये लसीकरणलाही मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. पण त्यासाठी जाहीर केलेले दर हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. सरकारने खर तर मोफत लस देणे गरजेचे आहे. त्या दराबाबत "लसीच्या दराबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प का आहेत" असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार पारिषदेत ते बोलत होते. 

लसीबाबत भारताने लवकर निर्णय घ्यावा. लसीचे उत्पादन आपल्याकडे होत आहे. तरी लस आपल्याकडे महाग कशी ? सगळ्यांना १५० रुपयात लस द्यावी. असेही यावेळी म्हणाले. कोव्हिडंमुळे मी आठवड्याची मुदत देतो अन्यथा जिल्ह्याजिल्ह्यात धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

पुढे ते म्हणाले, बेड, हॉस्टेल ताब्यात घ्यावेत. जिथे दोन्ही नसेल तिथे प्रायव्हेट हॉटेल आणि हॉस्पिटल ताब्यात घ्या. होम क्वारंटाइनमुळेही संख्या वाढतीये. आपल्याकडे अजून तरी प्रत्येकाला स्वतंत्र खोली नाही. त्यामुळे एकत्रित पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्याची गरज आहे. 

मोदींवर निशाणा साधत ते म्हणाले,  हाय कोर्ट काम करतंय तसं सुप्रीम कोर्ट करत नाही. पंतप्रधान निधीमध्ये किती निधी आला याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली नाही. माझ्या माहिती प्रमाणे हजार कोटींपेक्षा अधिक पैसे आले. काल पंतप्रधान मोदी यांनी या निधीचा वापर करू. असे सांगितल्यावर भाजपवाले त्यांची पाठ थोपटत आहे. पंतप्रधानांचे प्राधान्य बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवणे होते. शहा आणि मोदी यांनी मिळून २९४ सभा घेतल्या होत्या. कोविड वाढताना मोदी निरो सारखं वागत होते. रोम जळताना निरो व्हायोलिन वाजवत होता तसे यांचे लक्ष बंगालवर होते. आम्ही अपेक्षा करतोय तृणमुल काँग्रेसने तिथे पून्हा सरकार स्थापन करावं. असेही त्यांनी सांगितले आहे. 

केंद्र आणि राज्यानेही योग्य दक्षता घेतल्या नाहीत. यापुढे अशी परिस्थिती येऊ नये यासाठी पक्षातील सल्लागार यांची मते घेत बसू नका. सामंजस्य असणाऱ्या व्यक्तींना घेऊनच चर्चा करा. असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे. संचारबंदीमुळे साखळी तुटलेली नाही. ती तोडण्यासाठी  बधितांचे संपर्क तपासणे महत्वाचे आहे.


खरे मुख्यमंत्री कोण

मुखमंत्री उद्धव ठाकरे कुठंही दिसत नाहीत. सर्व निर्णय अजित पवारच जाहीर करत असतात. सध्या खरे मुखमंत्री कोण आहेत. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.


पंढरपूरला हजार बेडच्या हॉस्पिटलला परवानगी द्या 

पंढरपूर कोरोना वाढत असला तरी मंदिरांचे प्रमुख म्हणतात कि, आम्हाला परवानगी द्या आम्ही 1000 बेडच हॉस्पिटल सुरू करतो, का परवानगी का देत नाही? लोकांना सुविधा द्या, त्यामुळे मृत्युचे आकडे कमी होतील.

देशात लोक वाचवण्याला प्राधान्य द्या 

जस इंग्लंड, रशियामद्धे त्यांनी आपली लोक वाचवणे प्राधान्य आहे असं सांगितलं. आपण ही भूमिका का घेतली नाही ? या देशात आपल्याकडूच लसी पुरवण्यात आल्या. 

Web Title: Why are the Prime Minister, Chief Minister and Deputy Chief Minister silent about vaccine rates?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.