ते स्वराज्य आज कोणाच्या हाती आहे? अरविंद शिंदेंचा सवाल

By राजू इनामदार | Updated: March 11, 2025 16:23 IST2025-03-11T16:22:43+5:302025-03-11T16:23:40+5:30

शंभूराजांचे नाव घेऊन आपले बस्तान मांडणारे, त्यांच्या बलिदानाचा अवमान करत आहेत असे ते म्हणाले.

Whose hands is that Swaraj today Arvind Shinde question Congress Bhavan on the occasion of Martyrdom Day | ते स्वराज्य आज कोणाच्या हाती आहे? अरविंद शिंदेंचा सवाल

ते स्वराज्य आज कोणाच्या हाती आहे? अरविंद शिंदेंचा सवाल

पुणेछत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त काँग्रेसभवनमध्ये त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष अऱविंद शिंदे यांनी यावेळी आपल्या माती व माणसांसाठी जे अमर जाहले, ते स्वराज्य आज कोणाच्या हाती आहे? असा सवाल केला. शंभूराजांचे नाव घेऊन आपले बस्तान मांडणारे, त्यांच्या बलिदानाचा अवमान करत आहेत असे ते म्हणाले.

पक्षाच्या कार्यालयात यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस शिंदे यांनी पुष्पहार अपर्ण केला व अभिवादन केले. ते म्हणाले, ‘‘औरंगजेबाने शंभूराजे यांच्यासमोर जिवाच्या बदल्यात स्वराज्याचा सौदा केला होता. पण स्वराज्याच्या मातीशी आणि माणसांशी बेईमानी करेल तो शिवाचा छावा शंभू कसा? स्वराज्याच्या रक्षणाखातर त्यांनी आपले प्राण अर्पिले.

आपल्या माती व माणसांसाठी जे अमर जाहले. ते स्वराज्य आज कोणाच्या हाती आहे? केवळ छत्रपतींचे नाव घेवून ते मुगलांविरुद्ध होते असे खोटं हिंदुत्व भासवून धार्मिक तेढ निर्माण करायची. दुसरीकडे त्यांची सतत बदनामी करायची आणि हिंदुत्वाच्या नावावर आपलं बस्तान मांडायचं. स्वराज्यासाठी आपला देह त्यागलेल्या शंभू राजेंचा हा अवमान आहे. गुलाम होऊन पारतंत्र्यात खितपत पडण्याआधी जागे झाले पाहिजे. छत्रपती शंभू राजे सर्वांना बळ देवो!’’.

पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी बाळासाहेब अमराळे सुत्रसंचालन केले. प्राची दुधाणे, माया डुरे, अनुसूचित जमाती विभागाचे अध्यक्ष सुजित यादव, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, आबा जगताप, अनिल पवार, देवीदास लोणकर, सचिन सावंत, दिलीप लोळगे, भगवान कडू, सुंदर ओव्हाळ, अनिला धिमधिमे, प्रियंका मधाळे, अर्चना शहा, मंदा जाधव, ज्योती परदेशी, कविता भागवत, सचिन भोसले, संतोष हंगरगी, संदिप कांबळे, अभिषेक यादव व अन्य पदाधिकारी, कार्यकर्त उपस्थित होते.

 

Web Title: Whose hands is that Swaraj today Arvind Shinde question Congress Bhavan on the occasion of Martyrdom Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.