शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

दरवेळी नवऱ्याची अरेरावी कोण सहन करेल? लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या तब्बल ५९८ तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 13:08 IST

लॉकडाऊनच्या काळात घरच्यांना वेळ देण्याऐवजी पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आल्याची उदाहरणे समोर

ठळक मुद्देभरोसा सेलकडून ५५ जणांना टेलिफोनिक कौन्सिलिंग छोट्या छोट्या कारणांमुळे पत्नीला मारहाण करण्यापर्यंत पतीची मजल

पुणे : स्वयंपाक करण्यास थोडा उशीर झाला, त्याने सांगितलेल्या सुचनेकडे दुर्लक्ष करुन घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सांगण्याकडे लक्ष दिले, त्याच्या प्रोजेक्टमध्ये मदत करताना मनासारखे प्रेझेंटशन तयार न होणे, इतकेच नव्हे तर घरकामात मदत कर म्हणून म्हटल्याने  इगो दुखावल्याने मारहाण करणे, शिवीगाळ करणे, घरच्यांसमोर अपमानित करणे, लॉकडाऊनच्या काळात महिलांच्या शारीरिक व मानसिक अत्याचारात वाढ  झाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून पुणे कंट्रोलकडे तब्बल ५९८  तक्रारींची नोंद झाली असून भरोसा सेलच्या वतीने आतापर्यंत ५५ जणांना टेलिफोनिक कौन्सिलिंग करुन मार्गदर्शन करण्यात आले आहे.  सतत काम, धावपळ, ऑफिसच्या कामाचे दडपण, वरिष्ठांच्या सुचनेची तातडीने करावी लागणारी अंमलबजावणी यासारख्या अनेक कारणांचा पाढा कुटुंबाला वेळ देता येत नसल्याचे कारण नवरोबा पत्नीला देतात. मात्र लॉकडाऊनच्या काळात घरच्यांना वेळ देण्याऐवजी पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आल्याची उदाहरणे समोर आली आहेत. छोट्या छोट्या कारणांमुळे पत्नीला मारहाण करण्यापर्यंत पतीची मजल केली आहे. याविषयी अधिक माहिती देताना हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे म्हणाले, आमच्याकडे साधारण २० ते २५ तक्रारींची नोंद झाली आहे. यात प्रामुख्याने नव-याकडून पत्नीला शाररीक व मानसिक त्रास देण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून लोक घरात बसून आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्यात चिडचिडपणा येणे स्वाभाविक आहे. परंतु त्यावर कुणाला शिवीगाळ करणे, अपमानित करणे चुकीचे आहे. पतीला वेळेवर नाश्ता न मिळाल्याने त्याने पत्नीला शिवीगाळ व मारहाण केल्याची आमच्याकडे तक्रार आली आहे. यात पती पत्नीकडे वेगवेगळया पदार्थांची मागणी करत आहे. कामाचा ताण सहन न झाल्याने पत्नीची चिडचिड वाढली आहे. पतीला घराबाहेर पडता येत नसल्याने तसेच इतर कुणी बोलल्याने त्याचा राग घरच्या मंडळीवर काढत असल्याच्या तक्रारीची नोंद करण्यात आली आहे.उच्चशिक्षित मध्यम वर्गातील लोक असे वागत असतील तर काय म्हणावे? घरात सामान अस्ताव्यस्त करुन ठेवणे ते पत्नीने व्यवस्थित न ठेवल्यास तिच्या माहेरच्या व्यक्तींना दोष देणे, पत्नीने सासु सास-यांना उलट बोलणे असे प्रकार दिसून आले आहेत.     भरोसा सेलने देखील टेलिफोनिक कौन्सिलिंगच्या माध्यमातून अनेक नवरोबा, पत्नी आणि सासु सासरे यांना मार्गदर्शन केले आहे. लॉकडाऊन सुरु  झाल्यापासून ५५ तक्रारींचे समुपदेशन करण्यात आले आहे. यात सासु सासरे यांच्याकडून होणारा मानसिक व शारीरिक छळ, नव-याची अरेरावी तसेच पत्नीने पतीला एखादे काम सांगितल्यानंतर त्याचा राग पतीला येणे, माहेरच्या माणसांना दोष देऊन त्यांच्यावरुन टोमणे मारणे असे प्रकार होत आहेत. ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यात सुशिक्षित व्यक्तींचा समावेश मोठ्या संख्येने आहे. आपआपसात सुसंवाद साधुन एकमेकांना वेळ देण्यासाठी लॉकडाऊनचा उपयोग करण्याविषयी त्यांना सांगण्यात येते. कामाचा ताण, करियर, हे सर्व कायम असून त्याशिवाय असणारे आयुष्य सकारात्मकतेने जगण्यासाठी पती-पत्नीने एकमेकांना समजुन घ्यावे.  मुलांना वेळ द्यावा. त्यांच्याशी बोलण्याचा सल्ला त्यांना देण्यात येतो. 

* कौटुंबिक हिंसाचाराबाबत तक्रार करायची असल्यास पोलिसांकडून मदत मिळवता येईल. फँमिली कोर्टात सध्या मुलाबाळांची कस्टडी प्रकरणे (मुलांना भेटणे, घटस्फोट प्रकरणे) सुरु आहेत. मेलमार्फत देखील तक्रार नोंदवता येणार आहे. मुळातच पती-पत्नीने आपआपसांत संवाद ठेवण्याची आवश्यकता आहे.  सध्या घरकामासाठी मोलकरीण नसल्याने त्या सर्व कामाचा ताण पत्नीवर आला आहे. किरकोळ कारणावरुन वाद होत आहेत. आवडीची भाजी न बनवणे, किराणा माल खरेदीसाठी न जाणे यावरुन भांडणे होत आहे. महिलांनी पोलिसांची हेल्पलाईनचा आधार घेऊन तक्रार दाखल करावी.       -अ‍ॅड. वैशाली चांदणे (अध्यक्ष-पुणे फॅमिली कोर्ट असोसिएशन)  

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीadvocateवकिलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFamilyपरिवार