शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

मांजरींची नसबंदी करणार कोण?  निविदेला प्रतिसादच नाही  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 07:00 IST

‘मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार कोण’ ही म्हण प्रचलित असताना पालिकेला आता ‘मांजरीची नसबंदी करणार कोण?’ असे म्हणावे लागत आहे.... 

ठळक मुद्देस्वयंसेवी संस्थांना पालिकेने केले आवाहन 

पुणे : शहरातील भटक्या कुत्र्यांची महापालिकेकडून नसबंदी केली जाते. आता भटक्या मांजरींना पकडून त्यांचीही नसबंदी करण्यात येणार आहे. स्थायी समितीने पालिका प्रशासनाच्या या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. परंतू, या एकही निविदा न आल्याने त्याला मुदतवाढ द्यावी लागली आहे.  ‘मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार कोण’ ही म्हण प्रचलित असताना पालिकेला आता ‘मांजरीची नसबंदी करणार कोण?’ असे म्हणावे लागत आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चाललेली आहे. त्यांची पैदास रोखण्यासाठी पालिकेकडून भटक्या कुत्र्यांना पकडून नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते. तसेच त्यांचे लसीकरणही केले जाते. शस्त्रक्रिया व लसीकरणानंतर ही कुत्री पुन्हा पकडलेल्या ठिकाणी सोडली जातात. त्याच पद्धतीने आता भटक्या मांजरींवरही नसबंदी शस्त्रक्रियेसह लसीकरण केले जाणार आहे. याबाबतचे पत्र अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवले आहे.  त्यानुसार, राज्य शासनाने सर्व नगरपालिका, महापालिकांना पत्र पाठवून मांजरींची नसबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. भटक्या मांजरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी लसीकरण करणे व त्यांची संख्या मर्यादित राहण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. भारतीय जीव जंतू कल्याण मंडळाने केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचे आदेश दिले आहेत. पालिका हद्दीत आता भटक्या कुत्र्यांसह मांजरींचीची नसबंदी केली जाणार असून ६० महिने कालावधीसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी २० लाखाच्या वर्गीकरणाला स्थायी समितीने नुकतीचे मान्यता दिली आहे. त्यानुसार, आरोग्य विभागाने १७ सप्टेंबर रोजी निविदा प्रक्रिया राबविली. दिलेल्या मुदतीमध्ये एकही निविदा आरोग्य विभागाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. वास्तविक मांजरींना पकडून त्यांच्यावर नसबंदी करण्याचा अनुभव असलेल्या संस्था आणि ठेकेदार अत्यंत कमी आहेत. पुणे शहरात मांजरींच्या नसबंदीचे काम करणाºया एक -दोन खासगी संस्था सोडल्यास अन्य कोणी हे काम करीत नाही. त्यामुळे पालिकेच्या निविदा प्रक्रियेला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पालिकेनेच आता काही एनजीओंंना संपर्क साधून निविदा भरण्याबाबत अगर त्याविषयी काम करण्याबाबत विनंती केली आहे. ====ठेकेदाराला प्रत्येक मांजरीच्या नसबंदीमागे एक हजार रुपये देण्यात येणार आहेत. मांजर पकडण्यासाठी २०० रुपये आणि नसबंदी शस्त्रक्रियेसाठी ८०० रुपये असे एकूण एक हजार रुपये देण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेने अशा स्वरुपाचे कंत्राट एका संस्थेला दिलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातही एनजीओ अथवा खासगी संस्थेला काम देण्यात येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Puneपुणे