रस्त्यांवरील स्पीड ब्रेकरची जागा, उंची ठरवतो कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 11:58 AM2022-11-11T11:58:30+5:302022-11-11T12:00:15+5:30

रस्त्यांच्या प्रकारानुसार ‘स्पीड बम्प’, ‘स्पीड हम्प’ व ‘स्पीड टेबल’ या प्रकारीतल स्पीड ब्रेकर बसविण्याची तरतूद ‘अर्बन स्ट्रीट डिझाइन गाइडलाइन्स’मध्ये केली आहे..

Who decides the location and height of speed breakers on roads pune latest news | रस्त्यांवरील स्पीड ब्रेकरची जागा, उंची ठरवतो कोण?

रस्त्यांवरील स्पीड ब्रेकरची जागा, उंची ठरवतो कोण?

googlenewsNext

पुणे : शहरासह, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील स्पीड ब्रेकरमध्ये अनेकदा फरक असतो. पुणे शहरातील काही भागांमध्ये नियमानुसार स्पीड ब्रेकर तयार करण्यात आले आहेत, तर बहुतांश नियमबाह्य आहेत. पण अनेकांना या स्पीड ब्रेकरची जागा, उंची कोण ठरवतो? असा प्रश्न पडतो. नियमानुसार इंडियन रोड काँग्रेस (आयआरसी) ही १९३४ साली स्थापन झालेली संस्था स्पीड ब्रेकरची जागा, उंची यासह अन्य निकष ठरवत असते.

पण अनेकदा स्थानिक पातळीवर गरजेनुसार, अपघातांच्या पार्श्वभूमीवर सर्रास स्पीड ब्रेकर टाकले जातात. पण यामुळे देखील अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

स्पीड ब्रेकरचे तीन प्रकार..

रस्त्यांच्या प्रकारानुसार ‘स्पीड बम्प’, ‘स्पीड हम्प’ व ‘स्पीड टेबल’ या प्रकारीतल स्पीड ब्रेकर बसविण्याची तरतूद ‘अर्बन स्ट्रीट डिझाइन गाइडलाइन्स’मध्ये केली आहे. शहरातील रस्त्यांची तीन प्रकारांत विभागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये अति वर्दळीचे रस्ते, जोड रस्ते व रस्त्यांची रचना याचा विचार केला आहे. त्यानुसार ‘मोबिलिटी कॉरिडोर’, ‘फिडर रोड’ व ‘नेबरहूड स्ट्रीट’ असे तीन प्रकार निश्चित केले आहेत. मोबिलिटी कॉरिडोर रस्त्यांवर ‘स्पीड टेबल’ प्रकारातील स्पीड ब्रेकर बसविण्यात आले आहेत. स्पीड टेबल म्हणजे साधारण उंचवटा असून त्याची रुंदी अडीच ते तीन फूट असते. नेबरहूड रस्त्यावरील वाहनांचा वेग एकदम कमी करण्यासाठी ‘स्पीड बम्प’ प्रकारातील स्पीड ब्रेकर बसविण्याचे सुचवले आहे. या स्पीड ब्रेकरची रुंदी कमी असून तुलनेने उंची जास्त असते. तर, फिडर रस्त्यांवर ‘स्पीड हम्प’ प्रकारातील स्पीड ब्रेकर बसवायचा आहे. तो ‘स्पीड टेबल’ व ‘स्पीड बम्प’ यांच्यातील मध्य आहे.

महामार्गावरील स्पीड ब्रेकर कसे असावेत?

आयआरसीच्या निकषांनुसार स्पीड ब्रेकर कसा उभारावा, एकाच रस्त्यावर दोन स्पीड ब्रेकर उभारताना त्यात किती अंतर असले पाहिजे, त्यांची उंची किती असावी, याबाबत निकष ठरवले गेले आहेत. स्पीड ब्रेकर उभारल्यावर त्यावर थर्मी प्लास्टिक पेन्ट पट्ट्या, पांढरे पट्टे काढणे आवश्यक आहे. शिवाय वाहनचालकांना समजण्यासाठी ४० मीटर आधीच सूचना फलकही असणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक नसावेत, असे न्यायालयाने निर्देश दिले होते. मात्र, अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी गतिरोधक आवश्यक असल्याने रंबलिंग पद्धतीचे गतिरोधक उभारण्यात यावेत, असा निकष आहे. गतिरोधक उभारताना या गतिरोधकांची उंची अडीच ते दहा सेंटिमीटरपर्यंत, लांबी ३.५ सेंटिमीटर, वर्तुळकार क्षेत्र १७ मीटर असायला हवे.

Web Title: Who decides the location and height of speed breakers on roads pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.