शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

वाल्मीक कराडच्या मर्जीतले पोलीस कोण? तृप्ती देसाईंनी नावे केली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:11 IST

वाल्मीक कराडचे बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत असलेले संबंधही चव्हाट्यावर आले असून पोलीस अधिकारी अडचणीत सापडले आहेत

किरण शिंदे

पुणे: वाल्मीक कराड हा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईड असल्याचा आरोप वाल्मीक कराडवर आहे. सुरुवातीला फरार असणारा वाल्मीक कराड नंतर शरण आला. पोलिसांसमोर हजर झाला. तेव्हापासून वाल्मीक कराड बाबत धक्कादायक खुलासे होत आहेत. कधीकाळी घरगडी असणारा वाल्मीक कराड अरब पती कसा झाला याचे अनेक किस्से समोर आले आहेत.

 करोडो रुपयांची मालमत्ता बाळगून असणाऱ्या वाल्मीक कराडविषयी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सोबतच वाल्मीक कराडचे बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत असलेले संबंधही चव्हाट्यावर आले आहेत. इतकच नाही तर यामुळे काही पोलीस अधिकारी अडचणीतही सापडले आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी बीड जिल्ह्यातील 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे टाकली आहेत. 

पोलीस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची नावे 

1. बाळराजे दराडे बीड ग्रामीण-API2. रंगनाथ जगताप , अंबाजोगाई ग्रामीण -API3.भागवत शेलार , केज बीट  - LCB4.संजय राठोड , अंबाजोगाई - additional Police  5.त्रिंबक चोपने ,केज -Police 6.बन्सोड  ,केज  -API 7.कागने सतिश , अंबाजोगाई -  Police 8.दहिफळे, शिरसाळा-API9 सचिन  सानप , परळी बिट -  LCB 10.राजाभाऊ ओताडे ,बीड -LCB11 बांगर बाबासाहेब, केज -POLICE 12 .विष्णु फड , परळी शहर - Police13.प्रविण बांगर , गेवराई-PI 14 .अमोल गायकवाड , युसुफवडगाव ड्रायवर  Police15.राजकुमार मुंडे , अंबाजोगाई  DYSP ऑफिस- police 16 शेख जमिर, धारूर-  Police17 .चोवले  , बर्दापुर  -  Police18 .रवि केंद्रे,अंबाजोगाई- police 19.बापु राऊत,अंबाजोगाई - Police20 .केंद्रे भास्कर,परळी - Police21. दिलीप गित्ते , केज  DYSP ऑफिस- Police 22. डापकर-  DYSP ऑफिस   केज  - Police23 भताने गोविंद , परळी -police .24.विलास खरात , वडवणी  - Police.25 बाला डाकने,नेकनुर  - Police26. घुगे, पिंपळनेर -API

तर वर नाव असलेले अधिकारी आणि कर्मचारी वाल्मीक कराडचे निकटवर्तीय किंवा मर्जीतील असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलय. इतकच नाही तर गृहमंत्र्यांनी आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांची बदली बीड जिल्ह्याबाहेर करावी. तरच बीड जिल्ह्यातील गुंडाराज रोखता येईल असं तृप्ती देसाई यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान वाल्मीक कराड आणि बीड जिल्ह्यातील अनेक पोलिसांचे चांगले संबंध असल्याचे आरोप यापूर्वी झाले आहेत.. तर याच आरोपामुळे काही पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली देखील करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच वाल्मीक कराड आणि बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. मात्र बल्लाळ यांनी ऑडिओ क्लिप मधील आवाज आपला नसल्याचे सांगत आरोप फेटाळले होते. त्यानंतर आता तृप्ती देसाई यांनी तर 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादीच सोशल मीडियावर सार्वजनिक केली आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री या यादीची दखल घेऊन काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :Puneपुणेbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडPoliceपोलिसBeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडे