आपला सैनिकांबाबतचा आदर खोटा आहे का ; वाचा महिलेचा हृदयस्पर्शी अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 17:35 IST2019-06-15T17:33:56+5:302019-06-15T17:35:27+5:30
भारतीयांच्या मनात सीमेवर लढणाऱ्या सैनिकांविषयी कायमच आदराची भावना राहिलेली नाही. 'ए मेरे वतन के लोगो' ऐकल्यावर आजही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. मात्र याच्या अगदी उलट अनुभव पुण्यातील राजश्री थोरात या महिलेला आला आहे.

आपला सैनिकांबाबतचा आदर खोटा आहे का ; वाचा महिलेचा हृदयस्पर्शी अनुभव
पुणे : भारतीयांच्या मनात सीमेवर लढणाऱ्या सैनिकांविषयी कायमच आदराची भावना राहिलेली नाही. 'ए मेरे वतन के लोगो' ऐकल्यावर आजही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. मात्र याच्या अगदी उलट अनुभव पुण्यातील राजश्री थोरात या महिलेला आला आहे. त्यांचे पती नितीन थोरात यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला असून, कालपासून हा अनुभव व्हायरल झाला आहे.
याबाबत नितीन लोकमत'शी बोलताना म्हणाले की, 'या लिखाणातून माझ्या पत्नीच्या कृतीचं कौतुक होणं मला अपेक्षित नाही. पण त्यातून एकाने तरी बोध घेतला तरी त्याचे सार्थक होईल'.