शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

जिथे पिण्याच्या पाण्यासाठी कोसो दूर पायपीट व्हायची; आता तिथे विहिरी फुल्लं भरून वाहू लागल्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 12:04 IST

गुजरात, नाशिक, मुंबई, पुणे येथून नागरिक आले आणि त्यांनी येथे काम केले. परिणामी यंदा येथील पाणी साठा चांगला वाढला..

ठळक मुद्देउदाचीवाडी झाले पाणीदार; एप्रिल-मे मध्ये जाणवायची टंचाई

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून एप्रिल-मे महिन्यात उदाचीवाडीमध्ये ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हाल व्हायचे. परंतु, गेल्या दोन वर्षांमध्ये लोकसहभागातून येथे पाणी जिरविण्यासाठी डोंगर माथ्यावर आणि पायथ्यावर खड्डे तयार करण्यात आले. त्यामुळे आता येथील विहिरी भरून वाहू लागल्या आहेत. तसेच गतवर्षीच्या पावसाने एप्रिल-मे मध्ये पाणी कमी पडले नाही. हे पाणी जिरविण्याचे झालेले काम पुढच्या पिढीसाठी एक मोठा ठेवा असेल, अशाच भावना येथील ग्रामस्थांच्या आहेत. उदाचीवाडी येथे पाणी जिरविण्यासाठी पाणी फांउडेशनतर्फे खड्डे खोदण्याचा उपक्रम घेतला. गेली दोन वर्षांपासून तो सुरू आहे. गुजरात, नाशिक, मुंबई, पुणे येथून नागरिक आले आणि त्यांनी येथे काम केले. परिणामी यंदा येथील पाणी साठा चांगला वाढला असून, संपूर्ण वाडी पाणीदार बनली आहे. येथील कामाविषयी स्थानिक तरूण नामदेव कुंभारकर म्हणाले,‘‘आमच्या परिसरात २०१८ पासून खड्डे घेण्याचे काम सुरू झाले. गतवर्षी चांगला पाऊस झाला आणि खड्ड्यांमध्ये पाणी जिरले आणि साठले. मी लहान असताना म्हणजे १९९८ साली विहिरीमध्ये एवढं पाणी असायचे की, त्यात पोहता यायचे. पण गेल्या काही वर्षात तो आनंद घेता आला नाही. यंदा प्रथमच आम्हाला विहिरीत पोहता आले. कारण विहिरी भरून वाहू लागल्या आहेत. हे काम आता पुढील पिढीसाठी कायमस्वरूपी राहणार आहे.’’

===================पाणी पाहून कामाचे समाधानस्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या पुण्यातील प्रा. अनुष्का कजबजे म्हणाल्या,‘‘उन्हाळ्यात सुटीच्या दिवशी कुटुंबासह आणि मित्राबरोबर तिथे जाऊन खड्डे खणायचो. त्याचे ‘चिज’ आता झाल्याचे समाधान मिळत आहे. कारण इथे आता सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. असाच उपक्रम प्रत्येक गावात झाला तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पाणीदार होईल.’’==========================प्रत्येक गावात असे काम व्हावेगावात एकूण १७६ घरे असून, प्रत्येक घराने सांडपाण्यासाठी शोष खड्डे केले आहेत. त्यामुळे त्यातच सांडपाणी जाते. इतरत्र कुठेही वाहताना दिसत नाही. परिणामी स्वच्छता आपोआप राहते. असाच उपक्रम प्रत्येक गावी व्हायला हवा. तसेच ऊस हे पीक न लावता सीतापळ, अंजीर आणि ज्वारी, बाजरी, वटाणा, कांदा, कोबी असे पीक घेत आहोत.- नामदेव कुंभारकर, तरूण, उदाचीवाडी

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीdroughtदुष्काळ