शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेतला कुठे गेला एक दिवसाचा पगार?

By admin | Updated: June 11, 2015 06:11 IST

पोलिसांना सुटीच्या दिवशी काम केल्यास एक दिवसाचा पगार देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा हवेतच विरली असून, पोलिसांना

लक्ष्मण मोरे, पुणेपोलिसांना सुटीच्या दिवशी काम केल्यास एक दिवसाचा पगार देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा हवेतच विरली असून, पोलिसांना अद्यापही जुन्याच दराने भत्ता देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये नाराजी पसरली असून, त्याबाबतचा आदेशच पोलिसांना प्राप्त झालेला नसल्यामुळे शासनाने पोलिसांच्या तोंडाला पाने पुसल्याचे दिसत आहे. राज्यातील पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे राजकीय सभा, कार्यक्रम, निवडणुका, आंदोलने, दंगली, व्हीआयपी दौरे आदी घटनांवेळी पोलिसांच्या हक्काच्या सुट्या रद्द केल्या जातात. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना बंदोबस्तामध्ये उभे केले जाते. अनेकदा वैद्यकीय कारणास्तव तसेच कौटुंबिक अडचणीच्या वेळीही पोलिसांना सुट्या घेता येत नाहीत. सुटीच्या दिवशी काम केल्यास पोलिसांना भत्ता दिला जातो. पोलिसांना त्यांच्या एकूण वेतनापैकी मूळ वेतनाच्या प्रमाणात देण्यात येणारा भत्ता म्हणजे पोलिसांची एकप्रकारे केलेली थट्टाच आहे. दिवसभर काम केल्यानंतर ६० ते ९० रुपयांपर्यंतचा भत्ता दिवसभरासाठी देण्यात येतो. पोलिसांना यापुढे सुटीच्या दिवशी काम केल्यास एक दिवसाचा पगार देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. या घोषणेला महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला, तरी अद्याप त्यावर अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली नाही. एक दिवसाचा पगार मिळण्याचा आदेश केव्हा येतोय, याकडे पोलिसांचे डोळे लागले आहेत. परंतु, यावर गृह विभाग, पोलीस महासंचालक कार्यालय कोणतीही हालचाल करीत नसल्याचे चित्र आहे. पोलिसांचे कामाचे तास निश्चित नसल्यामुळे त्यांना कुटुंबाला वेळ देता येत नाही. मुलांचे शिक्षण, कुटुंबाच्या सोयीसुविधा, आरोग्य यांकडे लक्ष देता येत नाही. कुटुंबासोबत कुठे फिरायला जाता येत नाही. यासोबतच वरिष्ठांचा जाच, कामाचा ताण यांमुळे वैतागलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशीचा पगार मिळणार ही सुखावणारी घोषणा झाली खरी; परंतु त्याची अंमलबजावणी मात्र अद्याप सुरू झालेली नाही. पोलिसांना संघटित व्हायचा अधिकार नसल्यामुळे हक्कांसाठी भांडताही येत नाही; त्यामुळे दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्नही काही पोलिसांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)