शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

१0९0 क्युसेक्स पाणी मुरले कोठे?

By admin | Updated: June 4, 2015 05:25 IST

खडकवासला धरणातून १४०० क्युसेक्सने नुकतेच आवर्तन सोडले होते. यातील ३00 क्युसेक्स पाणी पुणे शहराला देण्यात आले.

इंदापूर : खडकवासला धरणातून १४०० क्युसेक्सने नुकतेच आवर्तन सोडले होते. यातील ३00 क्युसेक्स पाणी पुणे शहराला देण्यात आले. हडपसरपासून खाली ११०० क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडले, मात्र इंदापूरच्या तरंगवाडी तलावापर्यंत २० क्युसेक्स एवढेच पाणी पोहचले. मग, १०९० क्युसेक्स पाणी मुरले कोठे, असा प्रश्न विचारला जात आहे. माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी खडकवासला प्रकल्प सिंचन व्यवस्थापन उपविभागाचे, उपविभागीय अभियंता के. के. देवकाते यांच्यासह पत्रकारांना घेऊन तरंगवाडीत तलाव व परिसराची पाहणी केली. त्यावेळी ही वस्तुस्थिती उघड झाली. दि. ५ मे रोजी हे पाण्याचे चौथे आवर्तन मिळणे आवश्यक होते. मात्र ते दहा दिवस उशिरा १५ मे ला सोडण्यात आले. १४०० क्युसेक्स क्षमतेने खडकवासला कालव्यातून हे आवर्तन सोडण्यात आल्यानंतर ३०० क्युसेक्स पाणी पुणे शहरात देण्यात आले. हडपसरपासून खाली ११०० क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात आले. तरंगवाडीच्या अलिकडे दीड किलोमीटर अंतरावर ते २० क्युसेक्स एवढे रोडावले. काल ते तेथेच संपले. या संदर्भात माहिती घेतली असता, हडपसरपासून पुढे पाटस, यवत, दौंडपर्यंतच्या भागात हजारो शेतीपंप आहेत. सायफनची जाळे पसरलेले आहे. पिण्यासाठी सोडलेले पाणी शेती पंप व सायफनद्वारे उचलले जाते. पिण्यासाठी पाणी साठवताच येत नाही. या खेरीज इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्याच्या मार्गावर अनधिकृत अशी १२०० वीजजोड असल्याचा आरोप मखरे यांनी केला आहे. ती सुद्धा या काळात बंद ठेवण्यात आली नाही. याचाही फटका या आवर्तनाला बसला आहे. पाणी येणाऱ्या मार्गावर पिण्याच्या पाण्याच्या योजना असणाऱ्या गावांमधील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्यांना ही पाणी नाही. तरंगवाडी तलावात पाणी पोहोचले नाही. त्यामुळे इंदापूर शहराला देखील पिण्यासाठी पाणी नाही.(वार्ताहर)