शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सोलापूर रस्त्याच्या कोंडीचे ग्रहण सुटणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 2:25 AM

उड्डाणपूल, सायकल ट्रॅक, बीआरटी मार्ग : रुंदीकरण होऊनही, हडपसरमध्ये रोज होते तासन्तास कोंडी; अयोग्य फलकाने वाहनचालक रस्ता चुकतात

हडपसर : सोलापूर रस्ता आणि वाहतूककोंडी हे एक समीकरणच बनले आहे. स्वारगेट ते हडपसरदरम्यान सोलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अनेक शस्त्रक्रिया केल्या तरीसुद्धा वाहतूककोंडीचा आजार काही सापडला नाही, वाहतूककोंडी सुटावी, यासाठी रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल, त्यानंतर सायकलट्रॅक आणि पदपथ बनविले, त्यामुळे रस्ता रुंद होण्याऐवजी अरुंद झाला आणि वाहतूककोंडी सुटण्याऐवजी जटिल बनली आहे, असा त्रागा वाहनचालक आणि नागरिकांनी केला आहे.

हडपसर गाडीतळ येथील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपुलावर उड्डाणपूल, मगरपट्टा चौकात उड्डाणपूल उभारले आहेत. मात्र, या दोन्ही पुलांच्या सुरुवातीला दिशादर्शक फलक नसल्यामुळे नवशिक्या आणि शहरात नव्याने येणाऱ्या वाहनचालकांचा गोंधळ होत आहे. वैभव चित्रमंदिरासमोरील मगरपट्टा चौकातील उड्डाणपुलाच्या सुरुवातीला नामफलक आणि रिफ्लेक्टर नसल्यामुळे दररोज वाहनचालक फसतात. पुलाच्या कठड्याची उंची कमी असून, तीसुद्धा तुटलेली आहे, त्यामुळे दररोज रात्रीच्या वेळी वाहने त्यावरून जात असल्याने अपघात होत आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशसानाने त्याची दुरुस्ती केली नसल्याचे नागरिकांनी सांगितलेसोलापूर रस्त्यावर अवघा दोन किमी बीआरटी मार्ग शिल्लक आहे, त्यासाठी वॉर्डनची नियुक्ती केली आहे. बीआरटी मार्गातून येणाºया वाहनांवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाते. मात्र, तुटपुंज्या बीआरटी मार्गामुळे वाहतूककोंडी सुरळीत होण्याऐवजी विस्कळीत आणि वाहनचालकांना मन:स्ताप होण्यास जास्त मदत होत आहे, अशी तक्रार अनेक वाहनचालकांनी केली आहे. मगरपट्टा चौकातून पुण्याकडे जाण्यासाठी बीआरटी मार्ग शिल्लक नाही. मात्र, मार्ग फलक आजही झळकत आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे बुचकळ्यात पडत आहेत.बीआरटी असून अडचण नसून खोळंबासोलापूर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तुटपुंज्या बीआरटी मार्ग काढून टाकला पाहिजे. हडपसर ते स्वारगेटदरम्यान सकाळी आणि सायंकाळी वाहनांची गर्दी असते. त्यात मगरपट्टा चौक ते फातिमानगर चौकादरम्यान शिल्लक असलेला तुटपुंज्या बीआरटी मार्ग वाहनचालकांना अडथळा ठरत आहे. बसथांबे रस्त्यात असल्याने गर्दीतून बसथांब्यावर कसे जायचे, अशा प्रश्न पीएमपी प्रवाशांना पडला आहे.अस्वच्छ पीएमपीचे थांबे४पीएमपी प्रशासनाने लाखो रुपये खर्च करूनपीएमपी प्रवाशांसाठी बसथांबे उभारले आहेत. मात्र, रामटेकडी पूल, वैदूवाडी चौक या ठिकाणच्या बसथांब्यांची दयनीय अवस्था झाली आहे.रंगरंगोटी नाही, स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे हे बसथांबे प्रवाशांसाठी बांधले आहेत की बसथांबे बांधल्याचे दाखवण्यासाठी उभारले आहेत, असा प्रश्न पडला आहे.झाडे जळाली कशी...?रस्त्याची शोभा वाढावी आणि प्रवास करताना आल्हाददायक वातावरण असावे, या संकल्पनेतून महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च वृक्षारोपण केले. मात्र, त्याची निगा राखण्याचे काम करण्याकडे कायम दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. अनेक झाडांची वाढ झाली नाही, तर अनेक झाडे जळालेली दिसत आहेत. मात्र देखभाल-दुरुस्तीसाठी खर्च दाखविला आहे, तो कुठे जातो, याचा जाब नागरिकांनी विचारला आहे.बीआरटीचे धोकादायक बसथांबेगेल्या आठवड्यात बीआरटी मार्गात बस आणि मोटारीचा समोरासमोर अपघात झाला, त्यामध्ये सहा जण जखमी झाले. आतापर्यंतच्या अपघातामध्ये सर्वात जास्त अपघात बीआरटी मार्गात झाले आहेत. बीआरटी मार्गामुळे बसथांबे रस्त्याच्या मध्येच आणून ठेवले आहेत. त्यामुळे अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना बसथांब्यावर जीव मुठीत धरून जावे लागत आहे. अपघाताचा धोका असूनही प्रशासन अद्याप त्याकडे डोळेझाक का करीत आहे? 

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूरroad transportरस्ते वाहतूक