शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

सीईटीच्या तारखा कधी जाहीर होणार? उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितली माहिती..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 18:59 IST

सीईटी परीक्षांसाठी राज्यातील पूर्वीची 193 परीक्षा केंद्र 350 पर्यंत वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत

ठळक मुद्देटास्क फोर्स कडून प्राप्त होण्या-या सूचनेनुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेणार

पुणे : इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होऊन बराच कालावधी झाला आहे. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणा-या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी (सीईटी)अर्ज केला आहे. मात्र, अद्याप सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, पुढील तीन ते चार दिवसात सीईटीच्या तारखा प्रसिध्द होतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी पुण्यात सांगितले.

पुण्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांशी उदय सामंत यांनी संवाद साधला.त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. सीईटी परीक्षांसाठी  राज्यातील पूर्वीची 193 परीक्षा केंद्र 350 पर्यंत वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी काही कालावधी जात आहे. त्यामुळे या पूर्वी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंदाजित तारखांमध्ये बदल करावा लागला.

 महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता धूसर

कोरोना परिस्थितीत सुधारणा झाली तर महाविद्यालये सुरू करण्यास कोणतीही हरकत नाही. परंतु, कोरोनाची तिसरी लाट येताना दिसत असेल तर महाविद्यालये सुरू करणे धाडसाचे होईल. त्यामुळे टास्क फोर्स कडून प्राप्त होण्या-या सूचनेनुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल,असे उदय सामंत यांनी नमूद केले. परिणामी महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता पुन्हा धूसर झाल्याचे दिसून येत आहे.

पत्रकारिता विषयात विद्यार्थ्यांना पीएच. डी संदर्भात विद्यापीठाची चर्चा करून निर्णय 

केवळ मार्गदर्शक उपलब्ध नसल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रातमध्ये पत्रकारिता विषयात विद्यार्थ्यांना पीएच. डी. करता येत नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाच्या वारंवार निदर्शनास आणून देण्यात आले. मात्र, अद्याप यावर कोणताही सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही. याबाबत उदय सामंत यांनाच पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विद्यापीठाची चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेUday Samantउदय सामंतEducationशिक्षणPune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थी