शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
4
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
5
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
6
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
7
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
8
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
9
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
10
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
11
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
12
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
13
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
14
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
16
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
17
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
19
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
20
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत

जेव्हा पुणे महापालिकेच्या तब्बल २१५ जणांच्या हजेरीपत्रकावर पडतो ‘लेट मार्क’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 12:45 IST

सोमवारी नेहमीप्रमाणे ऐटीत मुख्य इमारतीमध्ये पोहचले खरे... पण सुरक्षारक्षकांनी गेटच बंद करुन घेतल्याने कोणालाच आतमध्ये येता आले नाही.

ठळक मुद्देगेट घेतले बंद करुन : तब्बल २१५ जणांच्या हजेरीपत्रकावर पडला  ‘लेट मार्क’कर्मचाऱ्यांनी बाहेर जाताना यापुढे खातेप्रमुखांची परवानगी घेऊनच बाहेर जावे असे आदेश कोट्यवधी रुपये खर्च करुन सुरु करण्यात आलेली ही यंत्रणा अनेक वर्षांपासून बंदचदररोज सकाळी दहा वाजता प्रवेशद्वार बंद करण्यात येणार

पुणे : पालिकेच्या ‘लेट लतिफ’ कर्मचारी सोमवारी नेहमीप्रमाणे ऐटीत मुख्य इमारतीमध्ये पोहचले खरे... पण सुरक्षारक्षकांनी गेटच बंद करुन घेतल्याने कोणालाच आतमध्ये येता आले नाही. अतिरीक्त आयुक्त बिपीन शर्मा यांच्या आदेशानुसार सकाळी दहा नंतर आलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना जवळपास पाऊण तास बाहेर ताटकळत उभे राहावे लागले. या सर्वांची नावे नोंदवून घेण्यात आली असून त्यांच्या हजेरी पत्रकावर ‘लेटमार्क’ लावण्यात येणार आहे. पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये दररोज शेकडो नागरिक कामासाठी येत असतात. सकाळपासूनच ही रेलचेल सुरु झालेली असते. परंतू, त्यांना संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी सकाळी वेळेत भेटतीलच याची शाश्वती नसते. अनेकदा वरिष्ठ अधिकारी वेळेत कामावर हजर झालेले असतात, परंतू कनिष्ठांचाच पत्ता नसतो. गेले काही दिवस पालिकेतील अतिवरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामावर येण्याच्या वेळांवर लक्ष ठेवून होते. उशिरा येण्याचे प्रमाण अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर सोमवारपासून या लेट लतिफांवर कारवाई करण्याचे आदेश अतिरीक्त आयुक्त बिपीन शर्मा यांनी दिले. त्यानुसार सोमवारी सकाळी दहा वाजता सुरक्षा विभाग प्रमुख माधव जगताप यांनी सुरक्षारक्षकांना पालिकेमध्ये येणारे सर्व प्रवेशद्वार बंद करुन घेण्याच्या सूचना दिल्या. या सूचनांनुसार सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले. दहानंतर आलेल्या कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्याला आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे गेटवर आरडाओरडा सुरु झाला. पावणे अकरा वाजता हे प्रवेशद्वार उघडण्यात आले. प्रत्येकाचा विभाग आणि पूर्ण नाव लिहून घेण्यात आले. या यादीनुसार हजेरी पत्रकावर लेट मार्क लावण्यात येणार आहेत. यासोबतच कर्मचारी चहा अथवा कामांच्या नावाने सतत बाहेर जातात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी बाहेर जाताना यापुढे खातेप्रमुखांची परवानगी घेऊनच बाहेर जावे असे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. सोमवारी सकाळी झालेल्या कारवाईमुळे दिवसभरात चहा घ्यायला बाहेर जाणाऱ्यांची संख्या एकदम घटल्याचे जगताप यांनी सांगितले. ====बायोमेट्रिकचा उडाला फज्जापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक सिस्टीम बसविण्यात आली होती. याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. परंतू, कोट्यवधी रुपये खर्च करुन सुरु करण्यात आलेली ही यंत्रणा अनेक वर्षांपासून बंदच आहे. याकडे कोणीही गांभिर्याने पहायला तयार नाही. ====मुख्य इमारतीमध्ये कारवाई करण्यास सुरुवात केली असली तरी स्थानिक पातळीवरील क्षेत्रीय कार्यालयांमध्येही यापेक्षा काही वेगळे चित्र नाही. क्षेत्रीय कार्यालयांमधील उशिरा येणाऱ्यां अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची आवश्यकता आहे. ====दररोज सकाळी दहा वाजता प्रवेशद्वार बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे उशिरा येणाºयांना शिस्त लागण्यास मदत मिळेल. तसेच जे अधिकारी-कर्मचारी वेळेत येतात त्यांच्यावर अन्याय होणार नाही. सोमवारी जवळपास २१५ जणांवर कारवाई करण्यात आली असून अतिरीक्त आयुक्त बिपीन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्याचा नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी निश्चित फायदा होईल. - माधव जगताप, सुरक्षा विभाग प्रमुख तथा अतिक्रमण निर्मुलन विभाग प्रमुख

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका