शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

निवडून आल्यावर लोककल्याणाचाच विचार व्हावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By राजू इनामदार | Updated: February 8, 2025 20:09 IST

लोकांच्या आकांक्षा पूर्ण करताना टीका सहन करण्याचीही तयारी लोकप्रतिनिधींनी ठेवायला हवी

पुणे : नेते असतात ते निवडून येतातच; पण निवडून आल्यानंतर कायम लोककल्याणाचा विचार व्हायला हवा. त्यासाठी अशी क्षमता वृद्धी संमेलने उपयुक्त ठरतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करताना टीका सहन करण्याचीही तयारी लोकप्रतिनिधींनी ठेवायला हवी, असेही ते म्हणाले.‘राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत’ यांच्या वतीने देशभरातील आमदारांसाठी दोनदिवसीय-क्षमता वृद्धी कार्यक्रम एमआयटी डब्ल्यूपीयू, कोथरूड, पुणे येथे झाला. त्यात फडणवीस बोलत होते. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना, झारखंड विधानसभेचे अध्यक्ष रवींद्रनाथ महातो, राजस्थान विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी, ‘एनएलसी भारत’चे संस्थापक-संयोजक डॉ. राहुल कराड, प्रा. परिमल माया सुधाकर, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस व्यासपीठावर उपस्थित होते. केंद्रीय रस्ते वाहतूक दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाइन संदेश दिला. देशभरातून विविध राजकीय पक्षांचे २०० पेक्षा जास्त आमदार यात प्रत्यक्ष सहभागी झाले होते.गडकरी यांनी लोकशाही किंवा राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण नाही असे सांगितले. समाजाचा विकास हे मूळ ध्येय आहे. गुणात्मक परिवर्तनानेच लोकशाही सक्षम होईल व त्यातूनच देश खऱ्या अर्थाने प्रगतिपथावर जाईल, असेही गडकरी म्हणाले.सुमित्रा महाजन यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. त्यात सुरुवातीपासून सहभागी होता आले याचा आनंद आहे. राजकारणात चांगल्या लोकांनी यायलाच हवे, आलेल्या लोकांनी आपल्या कामात सुधारणा करायलाच हवी, त्यासाठी अशा संमेलनांचा विचार होईल, असे महाजन म्हणाल्या. राम शिंदे, सतीश महाना यांचीही भाषणे झाली. घटनात्मक तरतुदींचा वापर व त्यातून जनकल्याण या पद्धतीने काम व्हावे, त्यासाठी हे प्रशिक्षण उपयोगी होईल, असेही त्यांनी सांगितले.संयोजक डॉ. राहुल कराड यांनी प्रास्तविक केले. विकासाचे राजकारण व्हावे, त्यातून देशाची प्रगती व्हावी, राजकीय पक्षांचा विचार निवडणुकीपुरता व्हावा, ती झाल्यावर आपण देशाचे प्रतिनिधी ही भावना निवडून आलेल्यांमध्ये तयार व्हावी, यासाठी हे संमेलन आहे, असे ते म्हणाले. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. लोकशाहीसाठी घंटानाद करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर विश्वशांती प्रार्थना झाली. आर्वी (वर्धा) विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार सुमित वानखडे हे ‘एमआयटी’चे माजी विद्यार्थी असून, त्यांचा फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEducationशिक्षणMahayutiमहायुती