शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादा बैठक घेऊन काय साध्य करणार? प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे बळी ठरलेल्या प्रकल्पग्रस्तांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 19:51 IST

वर्षांनुवर्ष मंत्र्यांनी बैठका घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या पदरी निराशाच

पुणे : जिल्ह्यातील लाभ क्षेत्रात येत नसलेल्या शेतक-यांच्या सातबा-यांवर टाकण्यात आलेले पुनर्वसनाचे शेरे कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवार (दि.16) रोजी संबंधित सर्व अधिका-यांची ऑनलाईन बैठक आयोजित केली आहे. पण नक्की जिल्ह्यात अशी किती गावे आहेत, शेतक-यांची संख्या किती या संदर्भात कोणतीही अपडेट माहिती प्रशासनाकडे नाही. अशी परिस्थिती असताना पवार बैठक घेऊन काय साध्य करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रशासन आणि शासनाच्या भोंगळ कारभाराचे बळी ठरलेल्या प्रकल्पग्रस्तांना पवारांच्या या बैठकी नंतर तरी दिलासा मिळणार का याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात तब्बल 25 लहान मोठ्या प्रकल्पांसाठी शेतक-यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. या जमिनी घेताना प्रशासनाने आंधळेपणाने सरसकट जमिनीवर पुनर्वसनाचे शेरे लावून टाकले आहे. जिल्ह्यात लाभ क्षेत्रात येत नसलेल्या गावांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर काही गावांमध्ये ठराविक भाग लाभ क्षेत्रात येत नाही. परंतु लाभ क्षेत्रात येत नसलेल्या शेतक-यांना आपल्या सातबा-यावरील पुनर्वसनचा शेरा कमी करण्यासाठी वर्षानुवर्ष सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात. हेलपाटे मारून काम होत नसल्याने अखेर एजंटांना लाखो रूपये देऊन आपला हक्काचा सातबा-यावरील शेरा कमी करावा लागतो. जिल्हा प्रशासनाने , अनेक मंत्र्यांनी असे लाभक्षेत्रात न येणा-या सातबा-यावरील पुनर्वसनाचे शेरे कमी करण्यासाठी अनेक मोहिम हाती घेतल्या. परंतु आता पर्यंत बाधित शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. 

उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी 25 पैकी दोन प्रकल्पाचे प्रस्ताव तयार उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आपल्या प्रचंड व्यस्त टाईमटेबल मधून पुणे जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेहमी बैठका घेतात. याच प्रमाणे मंगळवारी पुणे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्र (सिंचन सुविधा उपलब्ध नसलेल्या लाभक्षेत्रात) स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिन हस्तांतरण संदर्भात बैठक आयोजित केली आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्याची माहिती घेऊन उपस्थित राहण्याचे आदेश आहेत. परंतु प्रशासनाकडे 25 पैकी केवळ 2 प्रकल्पांची माहिती उपलब्ध आहे. यामुळेच अजित पवार अशा अपूर्ण माहितीच्या आधारावर काय निर्णय घेणार,  प्रकल्पग्रस्तांना दिलासा देणार का याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेFarmerशेतकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसGovernmentसरकार