शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

जो कारखाना चालवू शकत नाही तो विकास काय करणार? अजित पवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 13:17 IST

विचार करा जो कारखाना चालवू शकत नाही तो जुन्नरकरांचा काय विकास करणार? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

ओतूर : उमेदवार अनेक उभे राहतात तो त्यांचा अधिकार आहे. पण दहा वर्षांत तुम्ही इतरांच्या तुलनेत उसाला कमी भाव दिला. माळेगाव व सोमेश्वर साखर कारखान्यांचे भाव पाहिले तर ३६०० आहे. आणि तुम्हाला विघ्नहर सहकारी साखर कारखाना ३२०० देतो तोही बळं-बळं. याचा विचार करा जो कारखाना चालवू शकत नाही तो जुन्नरकरांचा काय विकास करणार? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. यावेळी जुन्नरचे आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्यावर अजित पवार यांनी टीका केली.  दरम्यान, अतुल हा जुन्नरच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी राहिला आहे. त्याने कधीही जातिपातीचे राजकारण केले नाही. एक कार्यकुशल, कर्तव्यदक्ष, सुसंस्कृत, संवेदनशील, अभ्यासू नेतृत्व म्हणून मी त्याच्याकडे पाहत आहे, असेही ते म्हणाले. महायुतीचे उमेदवार आमदार अतुल बेनके यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.  अजित पवार पुढे बोलतांना म्हणाले,'विरोधक टीका करतात की, राज्याची तिजोरी रिकामी केली. आम्ही भेदभाव करत नाही. आम्ही सर्वांना पुढे घेऊन चाललो आहे. त्यासाठी लाडकी बहीण योजना, मुलींच्या शिक्षणासाठी ५०% सवलत, शेतकऱ्यांसाठी वीजबिले माफ केली आहेत यासह अनेक योजना भविष्यात आपण सुरू करणार आहे. जुन्नर तालुक्यातील बिबट प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांसाठी दिवसा लाइट देणार आहोत. सत्तेत असल्यावर विकासकामे करता येतात. आम्ही सत्तेसाठी हपापलो नाही; पण ज्यांनी आम्हाला निवडून दिले त्यांना न्याय देण्यासाठी नवीन कामांना मंजुरी देण्यासाठी; तसेच काही कामांचा ‘स्टे’ उठवण्यासाठी आम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. मधल्या काळात कांदा प्रश्नामुळे आम्हाला लोकसभेला चांगलाच फटका बसला; पण त्या चुका सुधारण्यासाठी कांदा निर्यातबंदी उठवली. आज माझा कांदा उत्पादक शेतकरी खूश आहे. आदिवासी भागाचा प्रमुख हिरडा कारखान्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. मंजुरीपत्र देखील लवकरच देणार असल्याचे त्यांनी सांगितले.अतुल बेनके म्हणाले, गेली पाच वर्षे तालुक्यात प्रामाणिक सेवा करत आहे. तरुण पिढीला अधिकारी बनवण्यासाठी ‘एमपीएससी’, ‘यूपीएससी’ यांची लायब्ररी आणि प्रशिक्षण केंद्र, शिवनेरी किल्ला संवर्धन, आदिवासी विभागात कुकडेश्वर मंदिरासाठी, तसेच हिरडा कारखाना यासाठी अजित पवारांनी मोठा निधी मिळाला. मुस्लीम बांधवांना मोठा निधी मिळाला, पिंपळगावच्या राम मंदिरासाठी, आरोग्याच्या दृष्टिकोनातून नारायणगाव, ओतूर ग्रामीण रुग्णालय अशी अनेक कामे केली. कुकडी प्रकल्पातील पाणी देण्याचे आपण काम केले. त्यामुळे जुन्नरकरांनी मला ‘पाणीदार आमदार’ पदवी दिली आहे.‘जुन्नरच्या पाण्याला हात लावू देणार नाही’जुन्नर-आंबेगाव तालुक्यांच्या धरणांमधील पाण्याचे योगदान मोठे आहे. लोकांच्या जमिनी गेल्या आहेत. पाण्याचा अधिकार आपला आहे. आपल्याला फेरनियोजनाचे पाणी आणे पठार, कोपरे मांडवे येथे न्यायचे आहे. वल्लभशेठचा मुलगा जिवंत असेपर्यंत आपल्या पाण्याला कोण हात लावू शकणार नाही. कर्जत-जामखेडचे युवराज म्हणत असतील पाणी पळवू. महाराजांच्या जन्मभूमीतील आम्ही मावळे आहोत. आमच्या हक्काच्या पाण्यासाठी परकीय असो स्वकीय असो, कोणी जरी आमच्यासमोर उभा राहिला तरी आम्ही जुन्नरच्या पाण्याला हात लावून देणार नाही. माझी स्पर्धा कुणाबरोबर नाही. मी प्रामाणिक काम करत आलो आहे आणि प्रामाणिक काम करत राहणार असल्याचेही आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार