पुणे: छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त यावर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. राज्यभरातून शिवज्योत घेऊन येणारे युवक, विविध संघटनांचे कार्यकर्ते तसेच शिवभक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने गडावर दाखल झाले होते. रात्रीपासूनच गड परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. वाढत्या गर्दीमुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर आली. पहाटेच्या सुमारास शिवनेरी किल्ल्यावर चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त पसरले होते. मात्र या संदर्भात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी सांगितले की, पहाटे साडेतीनच्या सुमारास शिवभक्तांचा एक जथा शिवज्योत घेऊन गडावर दाखल झाला. ज्योत घेऊन काही युवक वेगाने पुढे सरकत होते. यावेळी मीना दरवाजाजवळ बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी त्यांना हळू जाण्याचे आवाहन केले. यावेळी गर्दीमुळे तिघेजण घसरून खाली पडले. या घटनेत त्यांना किरकोळ दुखापत झाली असून कोणतीही गंभीर जखम किंवा मोठी दुर्घटना घडलेली नाही.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आधीपासूनच पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटनेनंतर अतिरिक्त खबरदारी घेण्यात आली असून शिवभक्तांना टप्प्याटप्प्याने गडावर प्रवेश दिला जात आहे. तसेच गडावरून खाली उतरताना धावाधाव करू नये, शिस्त पाळावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही संदीप सिंग गिल यांनी केले आहे.
Web Summary : Shivneri Fort saw huge Shiv Jayanti crowds. Reports of a stampede circulated, but SP Gill clarified that a few fell, sustaining minor injuries due to the rush near Meena Darwaza. Police are managing the crowd systematically.
Web Summary : शिवनेरी किले में शिव जयंती पर भारी भीड़ उमड़ी। भगदड़ की खबरें आईं, लेकिन एसपी गिल ने स्पष्ट किया कि मीना दरवाजा के पास भीड़ के कारण कुछ लोग गिर गए, जिससे मामूली चोटें आईं। पुलिस भीड़ को व्यवस्थित रूप से प्रबंधित कर रही है।