शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शेतात गेला, काही क्षणांत घडला घात; ऊसफडात कुत्र्याच्या हल्ल्याने चिमुकल्याचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 15:30 IST

वनविभागाचा खुलासा मुलाच्या जखमा वन्यप्राण्याच्या नसून कुत्र्याच्या आहेत.

नसरापूर : ऊसतोड कामगाराच्या ५ वर्षीय मुलावर कुत्र्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला, ही घटना केंजळ (ता. भोर) येथे उघडकीस आली. दि. ७ रोजी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. वनविभागाने वन्यप्राण्याचा हल्ला नाकारून कुत्र्यानेच हल्ला केल्याचे स्पष्ट केले आहे. चाळीसगाव येथील कृष्णा किरण सोनवणे (वय ५) हे बालक आज सकाळी आई-वडिलांसह केंजळ येथील

ऊस फडात कामासाठी गेले होते. कृष्णाला शौचास लागल्याने आई सरला सोनवणे यांनी त्याला शेताच्या बाजूला पाठवले. थोडा वेळ वाट पाहिली, मात्र कृष्णा उसाच्या शेतात रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. भोर ग्रामीण रुग्णालयात नेले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. केंजळ (ता. भोर) येथे खळबळजनक घटना; वन विभागाचा स्पष्ट खुलासा. राजगड पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, पालकांचा जबाब घेत तपास सुरू केला आहे. परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.वनविभागाचा खुलासा मुलाच्या जखमा वन्यप्राण्याच्या नसून कुत्र्याच्या आहेत. घटनास्थळाची पाहणी केली असता कुत्र्याचे पायाचे ठसे सापडले. उपस्थित ऊसतोड कामगारांनीही कुत्र्याचा हल्ला पाहिला, असे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी सांगितले. वनविभाग तपास करत आहे. सदर मुलाच्या अंगावरील जखमा वन्यप्राण्याच्या नसून कुत्र्याने केल्या आहेत. आम्ही घटनास्थळाची पाहणी केली असता कुत्र्याच्या पायाचे ठसे निदर्शनास आले.

उपस्थित ऊसतोड कामगारांकडून माहिती घेतली असता त्यांनीही कुत्र्याने हल्ला केल्याचे सांगितले. बिबट्याचा किंवा इतर वन्यप्राण्याचा हल्ला झालेला नाही, असे नसरापूर वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले. वनविभाग तपास पूर्ण करून अहवाल सादर करणार आहे. या घटनेने केंजळ आणि परिसरातील शेतकरी, मजुरांमध्ये भीती व हळहळीचे वातावरण आहे. ऊस फडांभोवती कुत्रे वावरतात, मजुरांच्या मुलांसाठी हा धोका आहे. प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy in Sugarcane Field: Dog Attack Kills Young Boy

Web Summary : A 5-year-old boy died after a dog attack in a sugarcane field near Nasrapur. The forest department confirmed the attack was by dogs, not a wild animal. The incident has caused fear among local farmers and laborers.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्रAccidentअपघात